मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घरच्यांकडून लग्नाला नकार, 16 वर्षांच्या मुलीने प्रियकरसोबत जंगलात विषप्राशन करून संपवले जीवन

घरच्यांकडून लग्नाला नकार, 16 वर्षांच्या मुलीने प्रियकरसोबत जंगलात विषप्राशन करून संपवले जीवन

 दोघांनी वारंवार लग्न करण्यासाठी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण...

दोघांनी वारंवार लग्न करण्यासाठी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण...

दोघांनी वारंवार लग्न करण्यासाठी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण...

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 23 मे: घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून एका प्रेमीयुगुलांनी (boyfriend and girlfriend suicide) विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Dound) तालुक्यातील कुसेगाव येथील वनविभागाच्या जंगलात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली मुलगी ही पाटस येथील असून ती 16 वर्षांची अल्पवयीन आहे. तर आत्महत्या केलेला युवक 25 वर्षीय असून तो हा नानविज येथील रहिवासी होता. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा इरादा पक्का केला. दोघांनी आपल्या घरच्यांना लग्न करण्याबद्दल इच्छा व्यक्त केली. मात्र, घरच्यांनी लग्नाला नकार दिला. दोघांनी वारंवार लग्न करण्यासाठी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, कुटुंबीयांनी लग्न करण्यास नकार कायम ठेवला. त्यामुळे दोघेही जण हतबल झाले होते.

PUNE: किरकोळ कारणावरून वाद पेटला;महिलेच्या गुप्तांगावर लाथा मारत हत्येचा प्रयत्न

घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने नैराश्यातून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन या दोघांनीही कुसेगाव सुपा घाटातील वनविभागाच्या जंगलात आत्महत्या केली. दोघांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. गावातील लोकांनी जंगलात दोघांचे मृतदेह पाहिले आणि कुसेगाव पोलीस पाटलांना याची माहिती दिली. त्यानंतर गावाच्या पोलीस पाटलांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.

BMCचा 'हा' प्रकल्प करणार यंदा दादरकरांची जलकोंडीतून सुटका

मुलगी ही अल्पवयीन असून मुलगा दौंड तालुक्यातील राहणार आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पाटस पोलीस करीत आहेत.

First published:

Tags: Boyfriend, Girlfriend