• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • धक्कादायक! शाळेची बस सुटल्याने झाला नाराज; रडत घरी येत विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! शाळेची बस सुटल्याने झाला नाराज; रडत घरी येत विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

14 वर्षीय राहुल सरदार हा नववीमध्ये शिकत होता. सोमवारी तो शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडत रस्त्यावर पोहोचला. मात्र, त्याची बस सुटली.

 • Share this:
  भोपाळ 24 नोव्हेंबर : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh News) बैतूल जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बैतूल जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या नववीतील एका विद्यार्थ्याने आपली स्कूल बस सुटल्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे (Student Dies By Suicide After Missing School Bus). पोलिसांनी या घटनेबाबतची माहिती दिली आहे. ही घटना बैतूल जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास 40 किलोमीटर दूर असलेल्या घोडाडोंगरीच्या पोलीस चौकीजवळील आमडोहमध्ये सोमवारी घडली. घोडाडोंगरी पोलिसांनी मंगळवारी सांगितलं की 14 वर्षीय राहुल सरदार हा नववीमध्ये शिकत होता. सोमवारी तो शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडत रस्त्यावर पोहोचला. मात्र, त्याची बस सुटली. तो रडतच घरी आला आणि त्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं की राहुलचे चुलते कनिक सरदार यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल दररोज शाळेत जात असे. तो कधीच शाळेत अनुपस्थित राहिला नाही. अशात बस सुटल्यामुळे शाळेत जाता येणार नसल्याने तो नाराज झाला. याच कारणामुळे त्याने घरामागील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. कनिक सरदार यांनी पुढे सांगितलं की राहुल अभ्यासात अतिशय हुशार होता. प्रत्येक विषयात त्याला चांगले गुण मिळत असे. त्याला अभ्यासाची अतिशय आवड होती. तो दररोज शाळेत जात असे. मात्र सोमवारी स्कूल बस निघून गेल्याने शाळेत जाता आलं नाही. त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला. याच कारणामुळे त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: