मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शिक्षकाने मोबाईल हिसकवल्याने भडकली; 14 वर्षीय मुलीने केलं भयानक कांड, घेतला 20 जणांचा जीव

शिक्षकाने मोबाईल हिसकवल्याने भडकली; 14 वर्षीय मुलीने केलं भयानक कांड, घेतला 20 जणांचा जीव

14 वर्षीय मुलीने शाळेलाच लावली आग

14 वर्षीय मुलीने शाळेलाच लावली आग

या चौदा वर्षांच्या मुलीवर वीस जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीने तिची शाळा पेटवली होती. या आगीत शाळेतील वीस मुलांचा होरपळून मृत्यू झाला

नवी दिल्ली 27 मे : काळानुरूप लोकांच्या जीवनात बरेच बदल झाले आहेत. पूर्वीच्या लोकांमध्ये सहनशीलता जास्त असायची. लहान मुलांना मोठ्यांचा जास्त आदर असायचा. पण काळानुसार लोकांची जीवनशैली बदलत गेली. त्यामुळे एकत्र राहूनही कुटुंब एकाकी वाटू लागली. याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर झाला. जिथे पूर्वी मुलं फक्त खोडकर पण साधे खेळ खेळायची तिथे आताच्या मुलांमध्ये प्रचंड राग असल्याचं दिसून येतं.

अनेकदा ही मुलं अगदी किरकोळ गोष्टीवरुन काहीतरी मोठं आणि भयानक पाऊल उचलतात. त्यातही आजकाल मोबाईलची आवडही प्रचंड वाढली आहे. मोबाईल न मिळाल्याने मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर येतात. आता काहीशी अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका मुलीला किरकोळ गोष्टीवरून इतका राग आला की तिने तिची शाळाच पेटवून दिली.

मुंबईतील तरुणानं महिलेची हत्या करून दाताने ओरबडून खाल्लं चेहऱ्याचं मांस, दृश्य पाहून पोलीसही हादरले

या चौदा वर्षांच्या मुलीवर वीस जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीने तिची शाळा पेटवली होती. या आगीत शाळेतील वीस मुलांचा होरपळून मृत्यू झाला. खरं तर मुलीने शाळेत मोबाईल आणला होता. तिच्या शिक्षकांनी हे पाहिलं. शिक्षकाने विद्यार्थिनीकडून मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर चिडलेल्या मुलीने शाळाच पेटवून दिली.

घटनेच्या दिवशी मुलगी मोबाईल घेऊन शाळेत गेली होती. तिच्या शिक्षकांनी ते पाहिलं. शिक्षकाने सर्वांसमोर तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. या कारणामुळे तिला प्रचंड राग आला. विशेष म्हणजे या मुलीचं तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या वॉर्डनसोबत अफेअर असल्याचाही आरोप आहे. डिसिप्लिन अॅक्टनुसार मुलीवर कडक कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे तिचा फोन हिसकावण्यात आला. पण रागाच्या भरात तिने शाळेलाच आग लावली आणि वीस लोकांना ठार केलं.

First published:
top videos

    Tags: Crime news, Shocking news