मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /टाळं-चावी तयार करणाराच निघाला चोर; 35 तोळं सोनं चोरी झाल्यानंतर झाला खुलासा

टाळं-चावी तयार करणाराच निघाला चोर; 35 तोळं सोनं चोरी झाल्यानंतर झाला खुलासा

अखेर पोलिसांनी याचा छडा लावला.

अखेर पोलिसांनी याचा छडा लावला.

अखेर पोलिसांनी याचा छडा लावला.

इंदूर, 29 एप्रिल : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) खातीवाला टँकमध्ये एका व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून 35 तोळं सोनं चोरणाऱ्या आरोपींकडून पोलिसांनी 14 तोळं सोन ताब्यात घेतलं आहे. याशिवाय एका सोनारालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याने चोरांकडून स्वस्तात सोनं (Crime News) खरेदी केलं होतं. आरोपी आंतरप्रांतीय टोळीचा सदस्य आहे आणि दिल्लीपर्यंत चोरी केली जाते. हा आरोपी टाळं-चावी तयार करण्याच्या आड चोरी करीत असल्याचंही समोर आलं आहे.

एसीपी दिनेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी अपार्टमेंटमधील निवासी राधेश्याम अग्रवाल यांच्या फ्लॅटमधून 14 एप्रिल रोजी 35 तोळं सोनं आणि दीड लाख रुपयांची चोरी झाली होती. कुशनचा व्यवसाय करणारे अग्रवाल यांचा मुलगा राहुल अग्रवाल, सून मेघा, पत्नी रेखारानीसोबत नातवाचं मुंडन करण्यासाठी राजस्थानला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी कीर्तन सिंग आणि शंकर सिंगला आकाश नगर येथून अटक केली आहे. आरोपी ताळं आणि किल्ली तयार करण्याच्या आड रिकाम्या खोलीची रेकी करून चोरी करीत होते.

हे ही वाचा-लग्नानंतर पहिल्या रात्रीच नवरीचा प्रताप; सत्य समजताच नवरदेवाला बसला धक्का

दुसऱ्या फ्लॅटची दारं बाहेरून बंद केले...

First published:

Tags: Crime news, Gold, Madhya pradesh, Thief