मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! 8 वर्षात 14 वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल

धक्कादायक! 8 वर्षात 14 वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल

धक्कादायक! 8 वर्षात तब्बल 14 वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल

धक्कादायक! 8 वर्षात तब्बल 14 वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल

Woman commits suicide in Delhi : राजधानी दिल्लीत एका 33 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे. यासाठी तिने तिच्या लिव्ह-इन पार्टनरला जबाबदार धरलं आहे. त्यानं 8 वर्षात 14 वेळा तिचा गर्भपात केला होता.

    दिल्ली, 16 जुलै : राजधानी दिल्लीमध्ये एका महिलेनं आपल्या लिव्ह इन पार्टनरला कंटाळून आत्महत्या (woman suicide after suffering from live-in partner) केली आहे. लिव्ह इन पार्टनरवर महिलेचा 14 वेळा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप आहे. दक्षिण पूर्व दिल्लीतील जैतपूर भागात आत्महत्येचे हे धक्कादायक प्रकरण घडलं आहे. संबंधित 33 वर्षीय महिला गेल्या 8 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या 8 वर्षांत काळात संबंधित महिला 14 वेळा गर्भवती राहिली,परंतु तिच्या लिव्ह इन पार्टनरनं तिला प्रत्येकवेळी गर्भपात करण्यास भाग पाडलं. आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून या महिलेनं 5 जुलै रोजी आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांना ही आत्महत्या असावी, असं वाटत नव्हतं, परंतु त्यानंतर महिलेच्या कपड्यातून सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमधून ती एका व्यक्तीसोबत 8 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं कळलं आणि यादरम्यान तिच्या पार्टनरनं तिला तब्बल 14 वेळा गर्भपात करायला लावल्याचं समोर आलं. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बलात्कार या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला दिल्लीतील जैतपूर भागात राहते. महिलेचं आधी लग्न झालं होतं आणि तिला दोन मुलीही आहेत, मात्र 9 वर्षांपासून ती महिला पतीपासून वेगळी राहत होती. महिलेनं तिच्या दोन मुलींना वसतिगृहात शिकण्यासाठी पाठवलं होतं आणि सध्या ती स्वतः लिव्ह-इनमध्ये राहत होती. हेही वाचा: नागपुरातील धक्कादायक प्रकार, मित्राला मंग्या म्हटल्याने पती भडकला; थेट पत्नीलाच.. पोलिसांना 5 जुलै रोजी या महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळाली. महिलेने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या कपड्यांमधून एक सुसाइड नोट मिळाली. सुसाईड नोटमध्ये महिलेने गेल्या 8 वर्षातील परिस्थिती लिहिली होती. बिहारमधील मधेपुरा येथील एका व्यक्तीला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आलं होतं. आरोपी नोएडातील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतो. महिलेने लिहिलं आहे की, गेल्या 8 वर्षात ती 14 वेळा गरोदर राहिली पण प्रत्येक वेळी तिचा गर्भपात करायला लावला गेला. महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये आरोपीविरुद्ध पुरावे मोबाईलमध्ये ठेवत असल्याचं लिहिलं आहे. पोलिसांनी मोबाईल सील केला असून तपासानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Police, Suicide, Suicide news

    पुढील बातम्या