मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बापरे! 13 वर्षांच्या मुलाने केला 9 वर्षांच्या मुलाचा खून, राग आल्याने बुडवलं तलावात

बापरे! 13 वर्षांच्या मुलाने केला 9 वर्षांच्या मुलाचा खून, राग आल्याने बुडवलं तलावात

एका 13 वर्षांच्या मुलाने 9 वर्षांच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना (13 year old boy killed 9 year old over ordinary reason) समोर आली आहे.

एका 13 वर्षांच्या मुलाने 9 वर्षांच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना (13 year old boy killed 9 year old over ordinary reason) समोर आली आहे.

एका 13 वर्षांच्या मुलाने 9 वर्षांच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना (13 year old boy killed 9 year old over ordinary reason) समोर आली आहे.

चेन्नई, 2 डिसेंबर: एका 13 वर्षांच्या मुलाने 9 वर्षांच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना (13 year old boy killed 9 year old over ordinary reason) समोर आली आहे. खेळताना भांडणं झाल्यानंतर आईवडिलांकडे आपली तक्रार केल्याचा राग आल्यामुळे मुलानं हे पाऊल (Murder after fight) उचलल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना

तमिळनाडूतील विरुधुनगर परिसरात राहणाऱ्या दोन मुलांची मैत्री होती. त्यातील एक 13 वर्षांचा होता, तर दुसरा 9 वर्षांचा होता. दोघं खेळत असताना त्यांची एकमेकांशी भांडणं झाली. त्यानंतर 9 वर्षांच्या मुलाने त्याची तक्रार 13 वर्षांच्या मुलाच्या आईवडिलांकडे केली. त्यावरून बोलणी खाल्ल्याने चिडलेल्या मोठ्या मुलाने त्याच्या मित्राला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि अल्पवयीन मुलाच्या डोक्यात हत्येचा कट शिजला.

तलावात बुडवून केली हत्या

13 वर्षांचा मुलगा त्याच्या मित्राला तलावात घेऊन गेला आणि तिथं पाण्यात बुडवून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो गुपचूप घरी निघून गेला. 9 वर्षांचा मुलगा घरी न आल्याने कुटंबीयांनी शोधाशोध सुरू केली आणि पोलिसांत तक्रार नोंदवली. आजूबाजूच्या परिसरात शोध घेत असताना पोलिसांनी तलावाच्या पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला.

असा लागला शोध

ही हत्या की अपघात याचा शोध पोलीस घेत होते. त्यासाठी या परिसरातील काही पुरावे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. त्यावेळी याच परिसरातील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडलं. या फूटेजमध्ये मोठा मुलगा लहान मुलाला घेऊन चालल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी मोठ्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

हे वाचा- कामाच्या बदल्यात दिली लाजिरवाणी ऑफर, 'सहकुटुंब सहपरिवार'तील अभिनेत्रीची तक्रार

पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात त्याची रवानगी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Murder, Police, Tamil nadu