मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

15 वर्षाच्या मुलाचे सातवीतील मुलीशी प्रेमसंबंध, सहा महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर

15 वर्षाच्या मुलाचे सातवीतील मुलीशी प्रेमसंबंध, सहा महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर

ही 13 वर्षांची मुलगी चिमूर तालुक्यातील आहे. तसेच तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवणारा मुलाचे घर आणि तिचे घर जवळच आहे.

ही 13 वर्षांची मुलगी चिमूर तालुक्यातील आहे. तसेच तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवणारा मुलाचे घर आणि तिचे घर जवळच आहे.

ही 13 वर्षांची मुलगी चिमूर तालुक्यातील आहे. तसेच तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवणारा मुलाचे घर आणि तिचे घर जवळच आहे.

  • Published by:  News18 Desk
चंद्रपूर, 9 जुलै : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. (Crime News in Maharashtra) चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात लग्नाची जबरदस्ती करत तरुणीच्या घरात जाऊन विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण - एका 13 वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याची घटना घडली. ही तरुणी सातव्या वर्गात शिकते. मात्र, एका घराजवळ राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातूनच ती गर्भवती (13 year girl pregnant) राहिली. याबाबत तिला कोणतीच कल्पना नव्हती. मात्र, सहाव्या महिन्यात तिचे पोट दुखत असल्याने आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) यांनी दिली. यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही 13 वर्षांची मुलगी चिमूर तालुक्यातील आहे. तसेच तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवणारा मुलाचे घर आणि तिचे घर जवळच आहे. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यानंतर त्यांचे हे प्रेम थेट शारिरिक संबंधांपर्यंत पोहोचले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे. मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हेही वाचा - प्रेम करणं तरुणाला पडलं महागात; सख्ख्या भावानेच घेतला जीव, नागपुरातील दुहेरी हत्याकांडात मोठा खुलासा चंद्रपुरात जिल्ह्यात लग्नाची जबरदस्ती करत विनयभंग - एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यात घडली. राकेश रामाजी चहांदे नावाच्या एका तरुणाने एका तरुणीसोबत मोबाईल नंबरच्या आधारे ओळख केली. मात्र, या ओळखीच्या आधारावर त्याने एकर्फी प्रेम व्यक्त करत तो तरुणीच्या घरात शिरला आणि तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर त्याने लग्नासाठी आग्रह धरत मारहाणही केली. ही धक्कादायक घटना चंद्रपुरातील सिद्धार्थनगर येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. आरोपी राकेश रामाजी चहांदे हा चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील रहिवासी आहे. तर पीडित तरुणीही ही चिमूर तालुक्यातील रहिवासी आहे.
First published:

Tags: Chandrapur, Crime news

पुढील बातम्या