मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यातील गुंड गज्या मारणेच्या 13 साथीदारांना अटक, खंडणी प्रकरणात सापळा रचून आवळल्या मुसक्या

पुण्यातील गुंड गज्या मारणेच्या 13 साथीदारांना अटक, खंडणी प्रकरणात सापळा रचून आवळल्या मुसक्या

Crime in Satara: सातारा जिल्ह्यातील वाई येथील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी देवून खंडणीची मागणी (Demand ransom) करणाऱ्या 13 संशयित आरोपींना (13 suspects arrest) पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलं आहे.

  • Published by:  News18 Desk
वाई, 02 मे: सातारा जिल्ह्यातील वाई येथील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी देवून खंडणीची मागणी (Demand ransom) करणाऱ्या 13 संशयित आरोपींना (13 suspects arrest) पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलं आहे. हे सर्व आरोपी पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या (Goon gajya marane) टोळीतील असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास वाई पोलीसांकडून केला जात आहे. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी 29 एप्रिल रोजी काहीजण फिर्यादी प्रवीण दिनकर शिंदे यांच्या घरी आले. यावेळी अज्ञातांनी फिर्यादीच्या वडिलांकडून प्रवीण शिंदे यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीनं फिर्यादी प्रवीण दिनकर शिंदे यांना फोन करून 25 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. परंतु या लोकांना भेटायला गेल्यावर काही घातपात घडू शकतो, या भीतीपोटी फिर्यादीनं खंडणीखोरांना भेटायला न जाता याबाबतची माहिती वाई पोलिसांना दिली. त्यानंतर वाई पोलिसांनी सापळा रचून तीन कारमधून आलेल्या 13 जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 19 लाख किमतीच्या तीन चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. फिर्यादी प्रवीणनं आपल्या तक्रारीत म्हटलं की, त्यांनी दीड वर्षांपूर्वी साडू लक्ष्मण पार्टे (रा. तायघाट, ता. महाबळेश्वर) यांच्या मालकीची पाचगणी येथील शाळा चालवण्यास घेतली होती. यावेळी त्यांची ओळख पुण्यातील एका व्यक्तीशी झाली. तेव्हा त्या व्यक्तीनं आपण पुण्यातील गुंड गज्या मारणे यांच्यासोबत काम करत असल्याचं सांगितलं. तसेच तुला महाबळेश्वर परिसरात बांधकाम किंवा जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार चालू ठेवायचे असतील, तर दरमहा 25 लाख रुपये अथवा प्रत्येक व्यवहारामागं काही पैसे द्यावे लागतील. नाहीतर तुला जीवे मारू, अशी धमकी त्याने दिली होती. हे ही वाचा- वडापाव खाऊन पैसे दिले नाहीत; कुख्यात गुंड गजा मारणेवर दाखल झाला हा गुन्हा पण त्यावेळी फिर्यादीनं संबंधित व्यक्तीच्या धमकीकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्यानंतर गुरुवारी मिळालेल्या धमकीमुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर वाई पोलिसांनी साध्या वेषात सापळा रचून तीन गाडीतून आलेल्या 13 जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक संजय मोतेवार करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Satara

पुढील बातम्या