Home /News /crime /

सांगलीतील सामुहिक आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; सावकारासह 13 जणांना अटक

सांगलीतील सामुहिक आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; सावकारासह 13 जणांना अटक

म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंब आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली होती.

    सांगली, 21 जून : मिरज (Miraj News) तालुक्यातील म्हैसाळ येथे काल 20 जून रोजी सोमवारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली होती. यात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सांगलीतील एका एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष पिऊन आत्महत्या केली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भीषण आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी सावकारांसह 13 जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या हाती लागली होती सुसाईड नोट - म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंब आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. सुसाइड नोटमध्ये काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचं समोर आले होते.त्यादृष्टीने तपासासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याचं पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितलं. डॉ. माणिक वनमोरे यांच्यावर प्रचंड कर्ज असल्याने आर्थिक विवंचनेतून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती आहे. हेही वाचा - अहमदनगर हादरलं! पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार, पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न मृतांमध्ये यांचा समावेश - काल नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी 9 जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे राजधानी हॉटेलजवळ तर दुसरीकडे घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट वनमोरे , मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह आढळून आले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Sangli, Suicide

    पुढील बातम्या