मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात गहू चोर, दुकान फोडून चोरांनी तब्बल 125 पोत्या लांबवल्या

पुण्यात गहू चोर, दुकान फोडून चोरांनी तब्बल 125 पोत्या लांबवल्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

याप्रकरणी रेशन दुकानदार बळीराम आधवडे यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 22 ऑगस्ट : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आता पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील एका गावात चोरट्यांनी तब्बल 125 पोती गहू चोरल्याची घटना घडली. चोरच्यांनी वेल्हा तालुक्यातील शिरगावात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

याप्रकरणी रेशन दुकानदार बळीराम आधवडे यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बळीराम आधवडे यांचे वेल्ह्यातील शिरगावात रेशन दुकान आहे. चोरटयांनी दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या विटा काढून खिडकी बनवली. या खिडकीतून जवळपास गव्हाची तब्बल 125 पोती लंपास केली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती वेल्हा पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तर या रेशन दुकानात इतर वस्तूही होत्या. मात्र, याठिकाणी खिडकीचा आकार छोटा होता. म्हणून चोरट्यांना इतर वस्तू चोरता आल्या नाही आणि त्यांनी गव्हाच्या पोत्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - नागरिकांनो सावध राहा; मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video मधून कळेल नेमका प्रसंग

मक्याच्या शेतात जबरदस्तीने ओढून नेत सामूहिक बलात्कार -

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. राहुल हनुमंत जाधव असे मुख्य आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीला बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शनिवारी घडलेल्या या घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आला आहे. तिघांविरोधात भादवि 376सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राहुल हनुमंत जाधव या मुख्य आरोपीस वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दोघे अद्याप फरार आहेत.

First published: