• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • प्रसिद्धीसाठी 12 वर्षीय मुलीचं धक्कादायक पाऊल; पोलीस पित्याच्या गळ्यावरुन फिरवला चाकू अन्...

प्रसिद्धीसाठी 12 वर्षीय मुलीचं धक्कादायक पाऊल; पोलीस पित्याच्या गळ्यावरुन फिरवला चाकू अन्...

पोलिसांनी एका 12 वर्षीय मुलीला आणि तिच्या 13 वर्षाच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. या मुलीनं आपले 46 वर्षीय वडील नीफ लुइस यांची हत्या केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : अनेकदा असं म्हटलं जातं, की लहान मुलांना गजरेपेक्षा जास्त माहिती देणंही धोकादायत ठरतं. वयापेक्षा जास्त माहिती दिल्यानं बरोबर आणि चुकीच्या गोष्टींमधील फरक त्यांना समजत नाही. अशात ही मुलं अर्थाचा अनर्थ करून आपल्या डोक्यात एखाद्या गोष्टीबद्दल चुकीचे विचार आणतात. ब्राझीलमधून एक असंच प्रकरण समोर आलं आहे. यात एका 12 वर्षीय मुलीनं आपल्याच वडिलांचा जीव घेतला (Girl kills father). यामागचं कारण अत्यंत विचित्र आहे, जे वाचूनच तुम्हीही हैराण व्हाल दोन लाखांमध्ये पत्नीला विकलं आणि घेतला भारीतला फोन, पण... ब्राझीलच्या सँटा कॅटरिना (Santa Catarina) येथे पोलिसांनी एका 12 वर्षीय मुलीला आणि तिच्या 13 वर्षाच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. या मुलीनं आपले 46 वर्षीय वडील नीफ लुइस यांची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 15 ऑक्टोबरची आहे. या मुलीचे वडील स्वतःच एक पोलीस अधिकारी होते. हत्येचं कारण सर्वांनाच हैराण करत आहे. या मुलींनी ही हत्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली (Girl Killed Father to Become Famous). ती मुलगी 2002 साली झालेल्या एका हत्येच्या प्रकरणामुळे इन्सपायर झालेली. तिलाही हत्या करणाऱ्या मुलीप्रमाणे लवकर प्रसिद्धी मिळवायची होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 20 वर्ष आधी ब्राझीलमध्ये राहणाऱ्या सुजेननं आपलाय आई-वडिलांची हत्या केली होती. त्यावेळी ही मुलगी शाळेत शिकत होती. सुजेननं आपली मैत्रीण आणि बॉयफ्रेंडसोबत मिळून ही हत्या केलेली. 12 वर्षाच्या मुलीनं जेव्हा सुजेनच्या या केसबद्दल ऐकलं तेव्हाच तिनं ठरवलं की तिलाही सुजेनप्रमाणेच प्रसिद्ध व्हायचं आहे, जिला आपल्या आई-वडिलांच्या हत्येनंतर तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जेलमधून पॅरोलवर आलेल्या खुनी बापाची मुलाने केली हत्या, बुलडाण्यातील घटना मुलीनं आपल्या तेरा वर्षाच्या मैत्रिणीच्या मदतीनं पित्याच्या गळ्यावर तीन वेळा चाकू फिरवून हत्या केली. या दोन्ही मुलींना आता बालसुधारगृहात ठेवण्यात आलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुजेनप्रमाणेच या मुलींनीही आपला गुन्हा मान्य केला आहे, मात्र त्यांना याचा अजिबातही पश्चाताप नाही. त्या केवळ प्रसिद्ध होण्याचा विचार करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: