Home /News /crime /

बँकेतून पळवली 35 लाखांची रोकड; 12 वर्षांच्या मुलाचं चोरीसाठीचं प्लॅनिंग पाहून पोलीसही थक्क

बँकेतून पळवली 35 लाखांची रोकड; 12 वर्षांच्या मुलाचं चोरीसाठीचं प्लॅनिंग पाहून पोलीसही थक्क

पैशांची बॅग नेमकी कुठं ठेवली आहे, हे त्या मुलाला नक्की माहिती होतं. त्यामुळे तो थेट केबिनमध्ये गेला आणि बॅग पळवली.

चंदीगड 04 ऑगस्ट : पंजाबमधील पटियाला शेरावाला गेट परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) विभागीय शाखेतून बुधवारी (3 ऑगस्ट 22) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एक 12 वर्षांचा मुलगा आणि अन्य एका आरोपीने संगनमताने 35 लाख रुपयांची बॅग पळवली. ही सर्व रक्कम एटीएममध्ये लोड करण्यासाठी कॅशियरने बॅगमध्ये भरली होती. ती बॅग कॅशियरच्या केबिनमध्ये ठेवलेली असताना मुलाने ती लंपास केल्याने पोलिसही चक्रावले आहेत. बॅगचं वजन जास्त असल्याने ती घेऊन जाताना मुलाला चालणं अवघड होत होतं. परंतु, सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता त्या मुलासोबत दुसरी एक व्यक्ती असल्याचं समोर आलं. बँकेतून बॅग घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या दोघांनी एक ई-रिक्षा थांबवल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. बॅगची अशाप्रकारे चोरी करण्यासाठी मुलाला प्रशिक्षित करण्यात आल्याचंही पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर म्हटलं आहे. Crime News: अल्पवयीन मुलांची 25 लाखांसाठी अपहरण करुन हत्या, मित्रांनीच केला घात पैशांची बॅग नेमकी कुठं ठेवली आहे, हे त्या मुलाला नक्की माहिती होतं. त्यामुळे तो थेट केबिनमध्ये गेला आणि बॅग पळवली. कर्मचारी आणि कॅशियर मुख्य शाखेबाहेर एटीमएमध्ये रोख रक्कम भरत असताना चोरीची ही घटना घडल्याचं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. केबिनमध्ये परवानगीशिवाय कोणालाही जाता येत नसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. बँक कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह ही घटना बँकेकडूनही गांभीर्याने घेण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. कॅशियरने ती बॅग तीन ते पाच मिनिटांसाठी केबिनमध्ये ठेवली होती. या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केल्याचं पटियालाचे एसएसपी दीपक पारिख यांनी सांगितलं. या प्रकरणात काही सुगावा लागला असून लवकरच याचा उलगडा होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. मुलांना विश्वासात घ्या! चंद्रपुरमध्ये शाळकरी मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, Shocking कारण समोर दरम्यान, बँकेतील केबिनमधून बॅग पळवण्याची घटना गंभीर आहे. दुपारच्या वेळी बँकेत कामानिमित्त आलेले लोक, कर्मचारी असताना चोरीच्या उद्देशाने आत आलेला मुलगा कोणाच्याही नजरेस पडला नाही. त्याने आतमध्ये येऊन बॅग नेईपर्यंत उपस्थित सर्वजण काय करत होते, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या लहान मुलांना समोर करून त्यांना प्रशिक्षण देत चोरीच्या घटना अनेक शहरांत घडत आहेत. देशातील अनेक भागांत बाल गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आता या प्रकरणाचा पोलीस कशाप्रकारे माग काढून उलगडा करतात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत व नक्की काय घडलं याच्याबद्दलही चौकशी करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Theft

पुढील बातम्या