12 वर्षीय चिमुरड्यानं धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

12 वर्षीय चिमुरड्यानं धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Murder in Satara: सातारा जिल्ह्यातील नायगाव याठिकाणी एका 8 वर्षाच्या मुलाची गळ चिरून हत्या (8 Year old boy murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या चार तासांत पोलिसांनी हत्येचं गुढ उलगडलं आहे.

  • Share this:

shockingसातारा, 12 मे:  सातारा जिल्ह्यातील नायगाव याठिकाणी एका 8 वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या (8 Year old boy murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या चार तासांत हत्येचं गुढ उलगडलं आहे. 8 वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 12 वर्षाच्या मृताच्या भावाला ( 12 year old boy killed younger brother) ताब्यात घेतलं आहे. आरोपी मुलानं लहान भावाच्या हत्येची कबुली दिली असून हत्येमागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. हत्येचं कारण ऐकून आरोपी मुलाच्या आई वडिलांची पायाखालची जमीनच सरकली आहे.

आई आणि वडील दोघंही लहान भावावरचं अधिक प्रेम करतात. धाकटा माझ्यावर सतत लक्ष ठेवून असतो. काहीही चूक झाली तर सगळी माझ्यावरचं येते. याच रागातून त्यानं घरात कोणीही नसताना लहान भावाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येच कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहे. दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, मृत चिमुरड्याचे आई-वडील मुळचे कर्नाटकातील रहिवासी असून ते सध्या खंडाळा तालुक्यातील नायगाव याठिकाणी एका शेतीवर मजूर म्हणून काम करत आहेत.

हे वाचा-धक्कादायक! भलत्याच कारणामुळे पत्नीची गळा आवळून केली हत्या, स्वतःही दिला जीव

आई आणि वडील दोघंही दिवसभर शेतात कामाला जातात. तर दोन्ही भाऊ घरीच असतात. ते नेहमी घरात किंवा आसपासच्या परिसरात खेळत असतात. सोमवारीही आई वडील नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. तेव्हाही मुलं घराच्या परिसरात खेळत होती. पण सायंकाळी घरी परत आल्यानंतर त्यांना केवळ त्याचा मोठा मुलगाचं दिसला. त्याला लहान भाऊ कुठे आहे? असं विचारलं असता मला माहित नाही, असं उत्तर त्यानं दिलं. बराच वेळ झाला तरी मुलगा आला नाही. त्यामुळे चिंतातूर पालकांनी त्याला आसपासच्या परिसरात शोधायला सुरुवात केली.

हे वाचा-भाऊ अन् बायकोच उठले जीवावर, दीर-भावजयीनं दगडानं ठेचून केली हत्या

यावेळी घराजवळ असणाऱ्या पपईच्या बागेत लहान भाऊ रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचं आई वडिलांच्या निदर्शनास आलं. घटनेची माहिती फलटण पोलिसांना आणि एलसीबीच्या पथकाला कळताचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळाची पाहाणी करत असताना त्यांना हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही सापडली आहे. हत्या नेमकी कोणी केली याची चौकशी करत असताना पोलिसांना 12 वर्षाच्या मोठ्या भावावर संशय आला. त्याची चौकशी करत असताना त्यानं उलटसुलट उत्तर द्यायला सुरुवात केली. पण पोलिसांनी त्यांचं कौशल्य वापरून चौकशी केली असता, त्यानं हत्येची कबुली दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 2:38 PM IST

ताज्या बातम्या