मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शाळेत घुसून नराधमाचा 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!

शाळेत घुसून नराधमाचा 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape on School Girl: पुण्यातील एका गर्ल हायस्कूलमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 24 मार्च: काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) वडगाव शेरी परिसरात शाळेत शिरून एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या (female student murder in pune) करण्यात आली होती. आरोपी तरुणानं एकतर्फी प्रेमातून (one sided love) क्रूरतेचा कळस गाठत हे कृत्य केलं होतं. शाळेत हा धक्कादायक प्रकार घडल्यानं संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असताना आता, आता पुण्यातील एका गर्ल हायस्कूलमध्ये  11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Minor girl rape in school) केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

40 वर्षीय अज्ञात व्यक्तीनं पीडित मुलीला बळजबरीनं शौचालयात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. तसेच घटनेची वाच्यता न करण्याची धमकी देखील आरोपीनं पीडित मुलीला दिली होती. पण पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 40 वर्षीय अनोळखी नराधमाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-2 वर्षांनी नांदायला आली पण 2 महिनेही नाही टिकला संसार, नात्याचा थरारक शेवट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 11 वर्षीय मुलगी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या एका गर्ल हायस्कूलमध्ये शिकते. घटनेच्या दिवशी बुधवारी दुपारी ती नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. दरम्यान सकाळी अकराच्या सुमारास एका 40 वर्षीय अज्ञात व्यक्तीने तिला बोलावलं होतं. आरोपीनं तिची फसवणूक करत तिला शाळेच्या बाथरुममध्ये नेलं होतं. याठिकाणी गैरफायदा घेत आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं घडलेला प्रकार कुणालाही सांगितला, तर तुला बघतो, अशी धमकी दिली.

हेही वाचा- गोड बोलून घरी बोलावलं अन्..; पुण्यात तरुणीनं कुटुंबीयांसह प्रियकराला डांबून दिला भयंकर मृत्यू

मात्र पीडित मुलीनं या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. याबाबत माहिती मिळताच पालकांनी मुलीसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका अज्ञात व्यक्तीने शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published:

Tags: Crime news, Pune, Rape on minor