Home /News /crime /

Road Accident: मतदानासाठी जाणाऱ्या 11 जणांना भरधाव ट्रकने चिरडलं; तिघांचा मृत्यू

Road Accident: मतदानासाठी जाणाऱ्या 11 जणांना भरधाव ट्रकने चिरडलं; तिघांचा मृत्यू

मतदानासाठी आपल्या गावी जाणाऱ्या 11 जाणांना एका भरधाव ट्रकनं चिरडल्याची (Speedy truck hits 11 people) घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये 3 जणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. तर इतर 8 जण गंभीररित्या जखमी (Injured) झाले आहेत.

पुढे वाचा ...
    इटावा, 12 एप्रिल: मतदानासाठी आपल्या गावी जाणाऱ्या 11 जाणांना एका भरधाव ट्रकनं चिरडल्याची (Speedy truck hits 11 people) घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये 3 जणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. तर इतर 8 जण गंभीररित्या जखमी (Injured) झाले आहेत. या अपघातानंतर सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर आठ जखमी लोकांना इटावा आणि सैफई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. संबंधित घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या अपघातात बुद्वि सिंग (50), दीपक (25) आणि एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर रुपा (40), रिंकी (19), सीमा (22), प्रीती (19), आठ महिन्यांची रिया, सदीप (30) आणि प्रमोद (25) गंभीर जखमी झाले आहेत. एका जखमी व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. अपघातातील सर्वजण दिल्ली येथून झाशी पंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपापल्या गावी जात होते. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील बकेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हे सर्वजण झांसीच्या वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी रविवारी रात्री दिल्लीतून एक भाड्याची गाडी करून आपल्या गावी चालले होते, परंतु सोमवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. सर्व जखमींना डॉ. भीमराव आंबेडकर शासकीय संयुक्त रुग्णालयात दाखल केलं आहे. तर या जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी सैफई येथील मेडिकल युनिव्हर्सिटीत पाठवण्यात आलं आहे. हे ही वाचा- कारच्या धडकेत रिक्षातील CNG टाकीचा स्फोट, 4 जणं जागीच ठार; थरारक LIVE VIDEO आला समोर हा अपघात घडवून आणलेल्या भरधाव ट्रकचा अद्याप कोणताही सुगावा लागला नाही. या अपघातात जखमी झालेल्या लोकांनी सांगितलं की, ज्या कारने ते गावी चालले होते. ती कार वाटेत पंम्पचर झाली, त्यामुळे कारचं चाक बदलण्यासाठी सर्वजण कारमधून उतरून रस्त्यावर थांबले होते. तेव्हा एका अनियंत्रित भरधाव ट्रकने सर्वांना चिरडलं आहे. अपघातातील पीडित लोकं दिल्लीतून झाशीच्या पंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी जात होते. डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयाचे चिकित्सक डॉ. पीयूष त्रिपाठी यांनी सांगितलं की, बकेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आझाद हॉटेलजवळ घडलेल्या अपघातात जखमी झालेल्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, इतरांवर उपचार केले जात आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Road accident, Uttar pradesh

    पुढील बातम्या