मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दसऱ्याचा कार्यक्रम पाहुन घरी निघालेल्या दोन मुलींवर 10 जणांचा सामूहिक बलात्कार; परिसरात खळबळ

दसऱ्याचा कार्यक्रम पाहुन घरी निघालेल्या दोन मुलींवर 10 जणांचा सामूहिक बलात्कार; परिसरात खळबळ

तरुणांच्या टोळक्याने भावाला मारहाण केली आणि दोन्ही मुलींना (Rape On Minor) पकडून जंगलाच्या भागात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    गुमला, 17 ऑक्टोबर : दसऱ्याचा कार्यक्रम पाहुन घरी निघालेल्या दोन अल्पवयीन बहिणींवर 10 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली त्यांच्या भावासोबत दसरा मेळा पाहून घरी परतत होत्या. त्यावेळी वाटेत असलेल्या जंगल परिसराचा फायदा घेत नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणांच्या टोळक्याने भावाला मारहाण केली आणि दोन्ही मुलींना (Rape On Minor) पकडून जंगलाच्या भागात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. हा सर्व प्रकार झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील गुरदरी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन पीडित मुली शुक्रवारी आपल्या भावासह जोबीपाठ येथील दसरा मेळा पाहण्यासाठी गेल्या होत्या. जत्रा आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर दोघीही त्यांच्या 19 वर्षीय भावासोबत संध्याकाळी 7 वाजता घराकडे परत निघाल्या. त्यावेळी लोडा आणि चंपाकोना दरम्यान जंगलाच्या भागातून जात असताना अचानक 10 युवक मागून आले आणि दोन्ही मुलींना त्यांनी पकडले. या नराधमांनी भावाला मारहाण केली आणि त्याला तेथून पळवून लावले. यानंतर या 10 तरुणांनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. दुसरीकडे, जीव वाचवून पळून गेलेल्या भावाने गावात पोहोचताच ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. हे वाचा - 17 वर्षीय मुलाचे पत्नीशी होते अनैतिक संबंध; दसऱ्याच्या कार्यक्रमात बोलावून केला खून घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी कुटुंबीयांसह जंगलाच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, गावकरी येताना पाहून सर्व आरोपी मुलींना तेथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर पीडित मुलींनी कुटुंबासह पोलीस ठाणे गाठून अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांसमोर दिलेल्या निवेदनात पीडित मुलींनी आरोपींनी आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. या दरम्यान आरडाओरडा केल्याने आम्हाला मारहाणही करण्यात आल्याचे मुलींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, अद्याप आरोपी सापडलेले नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gang Rape, Rape news, Rape on minor

    पुढील बातम्या