बंगळुरु 17 जानेवारी : एका मुलाने आपल्या पित्याची हत्या करणाऱ्या आरोपींची पोलखोल केली. बंगळुरुच्या (Bengaluru) कारेनहल्ली येथे राहणाऱ्या 40 वर्षीय एन. राघवेंद्र यांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू (Natural Death) समजला जात होता. मात्र, त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाने पित्याच्या हत्याऱ्यांना सर्वांसमोर आणलं. मृत्यूनंतर श्रद्धांजली देण्यासाठी लोक एकत्र आलेले असताना राघवेंद्र यांच्या मुलाने सांगितलं की त्याच्या वडिलांची हत्या (Murder News) झाली आहे आणि हे सर्व एका बाहेरच्या व्यक्तीच्या उपस्थितीत झालं.
WION मध्ये आलेल्या वृत्तानुसार, एन राघवेंद्र बंगळुरुच्या कारेनहल्ली परिसरातील आपल्या घरात मृतावस्थेत आढळले होते. त्यांची ३० वर्षीय पत्नी शैलजाने आपल्या पतीच्या भावाला म्हणजेच शेखरला साधारण दोन वाजता फोन करत असा दावा केला की अपस्मारच्या अॅटॅकने (Epileptic Attack) तिचा पती कोसळला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मार्कांच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी, प्राध्यापकाला 2 वर्षांची शिक्षा
काही दिवसांना मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला. यात शैलजा आणि तिची मुलंही उपस्थित होती. याच दरम्यान आपले आजोबा नंजुंदप्पा यांच्यासोबत बोलताना राघवेंद्रच्या 10 वर्षीय मुलाने सांगितलं की ज्या दिवशी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यादिवशी घरात आणखी एक व्यक्ती होता. यानंतर त्यांनी मुलाला संपूर्ण घटना विचारली असता या प्रकरणाचा खुलासा झाला.
मुलाने सांगितलं, की घरात मोठ्याने आवाज आल्याने तो रात्री उशिरा जागा झाला. त्याने पाहिलं की त्याची आई आणि आईची आई म्हणजे आजी यांनी राघवेंद्रला जमिनीवर दाबून ठेवलं होतं. तर एक तिसरा व्यक्ती बेलण्याने त्याच्या डोळ्यावर वार करत होता. मुलाने पुढे सांगितलं, की जेव्हा मी त्यांना विचारलं की माझ्या वडिलांना का मारत आहात, तेव्हा त्या व्यक्तीने मला मारलं आणि धमकी देत म्हटलं की शांत राहा. याबद्दल कोणाला काही बोलल्यास तुलाही जीवे मारू, अशी धमकी त्याला देण्यात आली.
दीड महिन्यांपर्यंत पत्नीवर Gang Rape; प्रायव्हेट पार्टला सिगारेटचे चटके, अखेर...
या मुलाचं बोलणं ऐकल्यानंतर त्याचा चुलता शेखर याने पोलिसांत तक्रार दिली. याआधारे पोलिसांनी शैलजा, तिची आई लक्ष्मीदेवम्मा आणि हनुमंथा यांना अटक केली. चौकशीत समजलं, की हनुमंथा आणि शैलजा यांचं अफेअर सुरू होतं. पोलिसांनी सांगितलं, की राघवेंद्रने शैलजाला हनुमंथसोबतच्या संबंधांबद्दल अनेकदा विचारलं होतं. यामुळे दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bengaluru, Crime news, Murder news