मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /थर्टी फस्टला नशेचा ओव्हरडोस, तब्बल 1 कोटींचं ड्रग्स जप्त, 16 नायजेरियन ताब्यात

थर्टी फस्टला नशेचा ओव्हरडोस, तब्बल 1 कोटींचं ड्रग्स जप्त, 16 नायजेरियन ताब्यात

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने गुप्त माहितीच्या आधारे खारघर मधील एका रो हाऊसवर छापा टाकरण्यात आला.  या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी मुंबई, 1 जानेवारी, प्रमोद पाटील :  नवी मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने गुप्त माहितीच्या आधारे खारघर मधील एका रो हाऊसवर छापा टाकरण्यात आला. या छाप्यामध्ये जवळपास एक कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये चरस, गांजा, एमडी यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणात तब्बल 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून ही करावाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपींमध्ये महिलांचा समावेश  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खारघर मधील एका रो हाऊसमध्ये अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित रो हाऊसवर छापा टाकला. या छाप्यात जवळपास एक कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यामध्ये  चरस, गांजा, एमडी यासारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक केली आहे. आरोपींमध्ये 10 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने या सर्व आरोपींची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे.

आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट 

पोलिसांनी जेव्हा या रो हाऊसवर छापा टाकला तेव्हा आरोपी देखील तीथेच होते. पोलिसांची धाड पडताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात आरोपींची पोलिसांसोबत झटापट झाली. शेवटी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस फोर्स मागून आरोपींना बेड्या ठोकल्या. प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अजूनही काही अशा टोळ्या कार्यरत आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Crime news, Drugs, Mumbai police