Ruturaj Gaikwad Girlfriend Utkarsha : लग्नासाठी WTC चॅम्पियनशिपमधून माघार घेतलेल्या ऋतुराज गायकवाडने पहिल्यांदाच होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
Wriddhiman Saha Gujarat Titans :गुजरात टायटन्सला सलग दुसरं विजेतेपद पटकावण्यात अपयश आलं. या सामन्यात 38 वर्षांच्या ऋद्धिमान साहाने जबरदस्त कामगिरी केली. राज्याच्या संघाने अपमानास्पद वागणूक दिली, बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं तरी आपल्या खेळातून साहाने सर्वांना उत्तर दिलंय.
चेन्नई सुपरकिंग्सने कर्णधार एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून तब्बल पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
ipl 2023 chennai super kings champions : धोनीचा अखेरचा आयपीएलचा सामना आणि समोर बलाढ्य गुजरात टीम. पण मैदानात जर धोनी असेल तर विजय निश्चित असतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
अंबाती रायुडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्याच्यानंतर इतरही काही दिग्गज आहेत ज्यांच्यासाठी यंदाचे आयपीएल अखेरचे ठरू शकते.
एका ट्विटर युजरने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातलेले चाहते स्टेशनवर झोपले असल्याचं दिसतंय.
CSK vs GT Final 2023: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच कर्णधाराला न जमलेली कामगिरी पांड्या करून दाखवणार की धोनी ब्रिगेड पाचव्यांदा चषक उंचावणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबईविरुद्ध 5 विकेट घेतल्यानंतर चर्चेत आलेल्या मोहित शर्माने याआधही आयपीएल गाजवलंय. त्यानंतर तो अनसोल्डही राहिला आणि नेट बॉलर म्हणूनही भूमिका बजावली.
Mohit Sharma 5 Wickets: गुजरातने ५० लाख रुपयांमध्ये घेतलेल्या खेळाडूने फक्त १२ चेंडूत मुंबईची दाणादाण उडवली. त्याने ५ विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.
क्वालिफायर दोनच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई झाली. तर ऐनवेळी खेळाडुंच्या दुखापतीने टेन्शन वाढवलं. याशिवाय फलंदाजी क्रमातही रोहित शर्माने मोठी चूक केली.
GT vs MI Qualifier 2: गतविजेते गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये जाण्यासाठी क्वालिफायर दोन सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना होणार असून यात विजेता संघ चेन्नईविरुद्ध २८ मे रोजी फायनल खेळेल.
Mumbai Indians Comeback in IPL 2023: यंदाच्या आयपीएल हंगामाची खराब सुरुवात झाल्यानंतरही मुंबई इंडियन्स फायनलपासून अवघ्या दोन पावलांवर आहे. गुजरातविरुद्ध क्वालिफायर दोन सामना होणार आहे.
आयपीएल 2023 मध्ये केकेआरच्या रिंकू सिंगने धमाका केला, यानंतर त्याच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फक्त भारतच नाही तर परदेशातले चाहतेही रिंकूच्या कामगिरीचं कौतुक करत आहेत.
विराट कोहली हा जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर्सपैकी एक आहे. किंग कोहलीच्या क्रिकेट मैदानावरील परफॉर्मन्स सोबतच त्याच्या लुक्स आणि फिटनेसची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला काही वर्ष डेट केल्यानंतर तिच्याशी २०१७ मध्ये लग्न केले. विराट आणि अनुष्काला आता वामीका नावाची एक गॉड मुलगी देखील असून या दोघींना विराट त्याची स्ट्रेंथ समजतो. परंतु अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी विराट कोहलीने अनेक मुलींना डेट केले होते. तेव्हा विराट कोहलीच्या अफेअर्स आणि लग्नापुर्वीच्या त्याच्या गर्लफ्रेंड्सबद्दल जाणून घेऊयात.
आयपीएल 2023 अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. प्ले ऑफमध्ये फक्त काही सामने शिल्लक आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव करून त्यांचा आयपीएल प्रवास संपवला. अशा परिस्थितीत बिहारमधील नालंदा येथील एक व्यक्ती जो आरसीबीचा चाहता आणि विराट कोहलीसारखा दिसतो तो विराटच्या समर्थनार्थ उतरला आहे. आयपीएलमधून आरसीबीचा प्रवास संपल्याबद्दल त्याने संपूर्ण संघाला जबाबदार धरले आहे. (मो. महमूद आलम, प्रतिनिधी)
आयपीएल मॅचच्या दरम्यान मैदानात आणि मैदानाच्या बाहेर अनेक अविस्मरणीय घटना घडतात. या घटनांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेतील सर्व टीम आणि खेळाडू देखील स्पर्धेच्या दरम्यान खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. हे सर्व अपडेट ‘News18 लोकमत’च्या वेबसाईटवर उपलब्ध असतील. हे अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या