कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
Batsmen
Bowlers
All-Rounders
Wicket-keepers
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) : आयपीएल स्पर्धेचं दोन वेळा विजेतेपद पटकावणारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यंदा श्रेयस अय्यर या नव्या कॅप्टनसह उतरणार आहे. श्रेयस मागच्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडे होता. त्याला कोलकातानं 12 कोटींपेक्षा जास्त बोली लावून खरेदी केले आहे. केकेआरनं लिलावापूर्वी आंद्रे रसेल, सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर आणि वरूण चक्रवर्ती यांना रिटेन केले होते. त्यांनी लिलावामध्ये शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्स, अनुकूल रॉय, रसीक सलाम, अभिजीत तोमर, प्रथम सिंग, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊदी, एलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव बी इंद्रजीत आणि चामिका करुणारत्ने यांना खरेदी केले. यापैकी हेल्सनं वैयक्तित कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी केकेआरनं ऑस्ट्रेलियाच्या लिमिटेड ओव्हर्स टीमचा कॅप्टन आरोन फिंचची निवड केली आहे.