मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /लहान मुलांनाही मिळणार Vaccine! Zydus Cadila लसीच्या वापरासाठी मागणार परवानगी

लहान मुलांनाही मिळणार Vaccine! Zydus Cadila लसीच्या वापरासाठी मागणार परवानगी

12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांवर आपल्या लशीची चाचणी घेत असलेली झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे (Central Drug Controller of India) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज (EUA) करण्याची शक्यता आहे

12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांवर आपल्या लशीची चाचणी घेत असलेली झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे (Central Drug Controller of India) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज (EUA) करण्याची शक्यता आहे

12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांवर आपल्या लशीची चाचणी घेत असलेली झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे (Central Drug Controller of India) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज (EUA) करण्याची शक्यता आहे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 14 जून: 12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांवर आपल्या लशीची चाचणी घेत असलेली झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे (Central Drug Controller of India) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज (EUA) करण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रं, तसंच कंपनीतल्या काही अधिकाऱ्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून आठवड्याभरात ही कंपनी यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीच्या निष्कर्षांचं विश्लेषण जवळपास तयार आहे. त्यामुळे कंपनी मंजुरीसाठी अर्ज करू शकते, असं सरकारी अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

या लशीच्या वापराला मंजुरी मिळाल्यास डीएनए प्लाझ्मिड तंत्रज्ञानावर (DNA Plasmid Technology) आधारित विकसित केलेली ती जगातली पहिली लस ठरेल, असं बिजनेस स्टँडर्डच्या वृत्तात म्हटलं आहे. ZyCov-D असं या लशीचं नाव असून, ती अहमदाबादमधल्या झायडस कॅडिला या कंपनीने विकसित केली आहे.

कोरोना व्हेरियंटनं धारणं केलं रौद्र रूप, डेल्टा+ पुढे अँटीबॉडीज थेरपीही निष्प्रभ

फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना आदी कंपन्यांच्या लशी विकसित करताना mRNA तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. mRNAद्वारे मानवी शरीरातल्या पेशींना सूचना देऊन विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती विकसित केली जाते. त्या लशी उणे 70 अंश सेल्सिअस किंवा निदान उणे 15 ते उणे 25 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात साठवाव्या लागतात. भारतात एवढ्या कमी तापमानाची शीतसाखळी यंत्रणा पुरेशा प्रमाणात नाही. ZyCov-D या लशीत प्लाझ्मिड डीएनएचा वापर करण्यात आला आहे. त्याद्वारे मानवी शरीरातल्या पेशींना अँटीबॉडीज विकसित करण्याच्या सूचना दिल्या जातात. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानालाही साठवता येते. तसंच, व्हेरियंटमधल्या बदलानुसार या लशीमध्ये बदल घडवणंही mRNA लशीच्या तुलनेत सोपं आहे.

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की लहान मुलांमध्ये कोविड-19 ने गंभीर रूप धारण करण्याची शक्यता कमी आहे. तरीही महाराष्ट्र आणि कर्नाटकात अलीकडे लहान मुलांना कोविड झाल्याच्या बऱ्याच घटना आढळून आल्या आणि अनेक मुलांचे मृत्यूही झाल्याचं आढळलं. काही लहान मुलांना काळ्या बुरशीचीही लागण झाल्याचं आढळलं होतं.

Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

'लहान मुलांसाठी लशी उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत अधिकाधिक पालक आणि शिक्षकांनी लसीकरण करून घेणं आवश्यक आहे,' असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन (Samya Swaminathan) यांनी सांगितलं.

'आपल्याकडे मुलांसाठी लशी नक्की येतील; मात्र त्या यंदा विकसित होणार नाहीत. सामुदायिक संसर्ग कमी झाल्यानंतर आपल्याला शाळा उघडायला हव्या. बाकीच्या देशांनी योग्य ती काळजी घेत हेच केलं आहे. शिक्षकांचं लसीकरण झालं, तर ते सर्वांत महत्त्वाचं ठरेल,' असंही स्वामिनाथन यांनी सांगितलं.

सध्या अमेरिका, कॅनडा, युरोप आदी ठिकाणी 12 ते 15 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालं आहे. तसंच ब्रिटननेही फायझन-बायोएनटेकच्या लशीला या वयोगटासाठी मंजुरी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Corona virus in india