• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • ZyCov-D ला हिरवा कंदील; भारताने तयार केलेली जगातील पहिली DNA Plasmid कोरोना लस

ZyCov-D ला हिरवा कंदील; भारताने तयार केलेली जगातील पहिली DNA Plasmid कोरोना लस

ZyCov-D भारताची दुसरी स्वदेशी कोरोना लस.

ZyCov-D भारताची दुसरी स्वदेशी कोरोना लस.

DNA Plasmid आधारित Zydus cadila ची ZyCov-D ही 3 डोस असलेली कोरोना लस (Corona vaccine) आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : कोरोना महासाथीला टक्कर देण्यासाठी लवकरात लवकर लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जास्तीत जास्त कोरोना लशींना (Corona vaccine) मंजुरी देण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. आता देशात आणखी एका कोरोना लशीला मंजुरी मिळाली आहे, ही लस म्हणजे  ZyCov-D. जी भारताने तयार केलेली जगातील पहिली DNA Plasmid कोरोना लस आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील झायडस कॅडिला (Zydus cadila) कंपनीने तयार केलेली ही तीन डोसवाली लस. केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी  आणि इंडियन काऊन्सिलल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे. या लशीच्या आपात्कालीन वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. समितीने या लशीच्या दोन डोसांच्या प्रभावाबाबत अतिरिक्त डेटाही मागितला आहे. हे वाचा - पालकांनो सावध राहा! कोरोनानंतर AFM चं संकट; मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष नको कॅडिला हेल्थकेयर लिमिटेड कंपनीने या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळावी यासाठी एक जुलैला अर्ज केला होता. यावेळी 28 हजार जणांवर करण्यात आलेल्या शेवटच्या ट्रायलच्या डेटानुसार हे आवेदन करण्यात आलं होतं. या लशीचा प्रभाव  66.6 टक्के असल्याचं या ट्रायलमध्ये दिसून आलं. शिवाय ही लस  12 ते 18 वयोगटातील लहान मुलांसाठीही सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. हे वाचा - आनंदाची बातमी, भारतात लवकरच लहान मुलांसाठी आणखी एक लस भारताने तयार केलेली ही दुसरी स्वदेशी कोरोना लस आहे. तर भारतात दिली जाणारी पाचवी कोरोना लस. आतापर्यंत कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक आणि मॉडर्ना या लशींना मंजुरी देण्यात आली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: