कोरोनामुळं ज्या डॉक्टरांचा चेहरा पडला होता काळा, आता ओळखताही येणार नाही अशी झाली अवस्था

कोरोनामुळं ज्या डॉक्टरांचा चेहरा पडला होता काळा, आता ओळखताही येणार नाही अशी झाली अवस्था

या डॉक्टरांचा नवा PHOTO सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनामुक्त झाल्यावर अशी झाली चेहऱ्याची अवस्था

  • Share this:

बीजिंग, 28 ऑक्टोबर : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दोन चिनी डॉक्टरांमध्ये विचित्र लक्षणे दिसली होती. कोरोनामुळे त्याचे यकृत पुर्णत: खराब झाले होते, तर त्वचेचा रंगही काळा झाला होता. या डॉक्टरांपैकी एक डॉक्टर हू वेईफेंग यांचा मृत्यू झाला. मात्र चांगली बातमी अशी आहे की, दुसरे डॉक्टर यी फेन (Yi Fan) आता बरे झाला आहे आणि त्याच्या त्वचेचा रंगही सामान्य होऊ लागला आहे. डॉक्टर यी अनेक महिन्यांनंतर घराबाहेर पडले.

डेली मेलच्या वृत्तानुसार, 42 वर्षीय डॉक्टर यी फेन आणि डॉक्टर हू वेईफेंगच्या त्वचेचा रंग काळा पडला होता. हे दोघेही वुहानच्या रूग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. याचदरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दोघांना वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोघांनाही लाईट सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा चेहरा पाहून स्वत: ला ओळखूही शकत नव्हते.

वाचा-खूशखबर! आणखी एक मेड इन इंडिया कोरोना लस; क्लिनिकल ट्रायलसाठी मिळाला ग्रीन सिग्नल

वाचा-"15 मिनिटांतच कोरोनामुक्त झाला माझा मुलगा", डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा

डॉक्टर वेईफेंग यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, कित्येक महिन्यांपासून या आजाराशी झुंज दिल्यानंतर डॉक्टर यी फॅन कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयातील प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या त्वचेता रंग अँटीबायोटिकमुळे काळा पडला. डॉ. यी फेन हे वुहान सेंट्रल हॉस्पिटलमधील हृदय व तज्ज्ञ आहेत. चीनच्या वुहानमधून डिसेंबरमध्ये कोरोनाचा जगभर प्रसार झाला. सध्या सर्व देश कोरोनावर उपचार करणारी लस शोधत आहेत. चीन आणि रशिया यांनी लस शोधल्याचा दावा केला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 28, 2020, 8:09 AM IST

ताज्या बातम्या