Home /News /coronavirus-latest-news /

WHO अलर्टवर! 'या' देशात बदललं कोरोनाव्हायरसचं रुप, लसही ठरणार निरुपयोगी

WHO अलर्टवर! 'या' देशात बदललं कोरोनाव्हायरसचं रुप, लसही ठरणार निरुपयोगी

शिक्षकांची कोरोना तपासणी आवश्यक असणार आहे.

शिक्षकांची कोरोना तपासणी आवश्यक असणार आहे.

WHO ने कबूल केले आहे की कोरोनाव्हायरसमध्ये म्यूटेशन होत आहे आणि यामुळे लस (Covid-19 Veccine) तयार करणाच्या सर्व प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकतो.

    जेनेव्हा, 09 नोव्हेंबर : जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये कोरोनाबाधित (Mutated Coronavirus) रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. अशातच डेन्मार्कमध्ये वेगळ्या प्रकारच्या SARS-CoV-2 कोरोनाव्हायरसची 214 प्रकरणं आढळून आली आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO ) हाय अलर्ट जारी केला आहे. WHO ने कबूल केले आहे की कोरोनाव्हायरसमध्ये म्यूटेशन होत आहे आणि यामुळे लस (Covid-19 Veccine) तयार करणाच्या सर्व प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकतो. रविवारी जगात कोरोना रूग्णांची संख्या 5 कोटींच्या पुढे गेली. आतापर्यंत 5 कोटी 3 लाख 69 हजार 940 लोकांना संसर्ग झाला आहे. 3 कोटी 56 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. सध्या 1.34 कोटी, म्हणजेच 26.79% रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संसर्गामुळे आतापर्यंत जगातील 12 लाख 57 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, डेन्मार्कमध्ये सापडलेल्या या नव्या प्रकारच्या कोरोनामुळे चिंता आणखी वाढली आहे. वाचा-विक्रमी रुग्णांनी केली ‘कोरोना’वर मात, मार्केटमध्ये गर्दी वाढल्याने चिंता दरम्यान, 5 नोव्हेंबरला डेन्मार्कमध्ये सापडलेल्या या 12 प्रकरणांमध्ये एक खास प्रकारचा कोरोना स्ट्रेन आढळून आला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कोरोनामधील बदलांमुळे डेनिश सरकार एक कोटी 70 लाख उंदीर मारण्याचा विचार केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की उंदीर नवीन SARS-CoV-2 साठी कारणीभूत ठरू शकतात. वाचा-करून दाखवलं.. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'मुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश WHO ने तपास सुरू केला WHOशी संबंधित माईक रायन म्हणाले की माणसांना पूर्णपणे शास्त्रीय तपासणीसाठी बोलावलं गेलं होतं. हा व्हायरस चीनमध्ये कोरोना संक्रमित उंदरांपासून मनुष्यांमध्ये संक्रमित झाला होता. तेव्हाच, WHOच्या एका अधिकाऱ्याने जिनिव्हामध्ये म्हटलं होतं की, आम्हाला डेन्मार्कमध्ये उंदीरांपासून कोरोनो व्हायरसची लागण झालेले अनेक लोक आढळले आहेत ज्यांच्यात कोरेना व्हायरसमध्ये काही अनुवांशिक बदल दिसले. त्यामुळे डॅनिश अधिकारी या निष्कर्षांच्या व्हायरलॉजिकल तपासण्या करत आहेत. वाचा-कोरोनामुक्तीचं प्रमाण 91 टक्क्यांच्या वर, 'मात्र दुसऱ्या लाटेचा धोका कायम' उंदरांना ठार करणं हा एकच पर्याय डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात 15 ते 17 लाख उंदीर आहेत. आरहस विद्यापीठाच्या व्हेटर्नरी अँड वाइल्डलाइफ मेडिसिनचे प्राध्यापक क्रिश्चियन सोन यांनी एका ईमेलमध्ये म्हटलं आहे की, खबरदारी म्हणून आता उंदरांना ठार करणं हे भविष्यातील उद्रेक रोखण्यासाठी एक चांगला निर्णय आहे. नाहीतर उंदरांच्या माध्यमातून कोरोना पसरला तर त्यांना नियंत्रित करणं अतिशय कठीण होईल. कोणतीही उपाययोजना नंतर करण्यापेक्षा आधीच आव्हानांचा अंदाज बांधून उपाययोजना केलेली फायद्याचं ठरतं. त्यामुळेच जागतिक स्तरावर वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. लस आली तर कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवणं शक्य होईल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या