मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाला रोखण्यासाठी 90% देशांकडे आरोग्य यंत्रणाच नाही, WHOचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

कोरोनाला रोखण्यासाठी 90% देशांकडे आरोग्य यंत्रणाच नाही, WHOचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही 62 लाखांपेक्षाही जास्त असून 1, 88,000 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही 62 लाखांपेक्षाही जास्त असून 1, 88,000 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जगातील 90% पेक्षा जास्त देशांच्या आरोग्य यंत्रणेवर गंभीर परिणाम झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

    लंडन, 01 सप्टेंबर : कोरोनाव्हायरस (Coronavirus) प्रसार वेगाने होत असताना जगभरातील जवळजवळ सर्वच देश आता या रोगाच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे जगातील 90% पेक्षा जास्त देशांच्या आरोग्य यंत्रणेवर गंभीर परिणाम झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मार्च ते जून या कालावधीतील डेटामधून असे दिसून आले की, सर्व देशांची आरोग्य यंत्रणा आता कमकुवत झाली आहे, आणि जर असेच सुरू राहिले तर अधिक दिवस ही आरोग्य यंत्रणा टिकवता येणार नाही. दरम्यान, यावेळी WHOने असा इशाराही दिला आहे की जे देश तयारी न करता लॉकडाऊन हटवत आहे ते, कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत आहेत. WHOच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे बर्‍याच रुटीन अपॉइंटमेंट आणि स्क्रीनिंग रद्द केल्या जात आहेत. तर, कोरोनामुळे कर्करोगाच्या उपचारांसारख्या क्रिटिकल केअरही गंभीर परिणाम झाला आहे. मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या देशांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागला. अर्ध्याहून अधिक देशांमध्ये, गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन (68%), मानसिक आरोग्याच्या समस्येवर उपचार (61%) आणि कर्करोगाच्या (55%) परिणाम झाला. एक चतुर्थांश देशांमधील आपतकालिन सेवांवर परिणाम झाला. वाचा-पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण; Coronavirus चे महाराष्ट्रातले आकडे लशीची घाई ठरणार धोकादायक जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की कोरोना व्हायरस लस मंजूर करण्याच्या प्रक्रियेस 'गांभीर्याने' घेण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी पत्रकारांना सांगितले की सर्व देशांना चाचण्या पूर्ण केल्याशिवाय औषधे मंजूर करण्याचा अधिकार आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. WHOचे म्हणणे आहे की सध्या 143 लशींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत, तर 33 लसी सध्या पूर्व-क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. WHOने स्पष्ट केले आहे की, जे देश क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्याशिवाय लस वापरण्याच्या विचारात आहेत त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते. वाचा-आता नवं आव्हान! कोरोना लशीच्या एका डोसमध्येही व्हायरसला हरवणं अशक्य जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, जगभरात सध्या 2 कोटी 53 लाख 18 हजार 901 कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8 लाख 47 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. व्हाइट हाउसकडून जनतेला असे सांगण्यात आले आहे की, लशीची वाट पाहू नका तुम्ही सावध रहा. तर युरोपातील बऱ्याच देशांमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी केली जात आहे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या