सावधान! 29 देशांमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, WHO नं व्यक्त केली भीती

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा सामना सध्या देश करत आहे. ही लाट ओसरण्याच्या आतच आणखी एक काळजीची बातमी आहे.

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा सामना सध्या देश करत आहे. ही लाट ओसरण्याच्या आतच आणखी एक काळजीची बातमी आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून : कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा सामना सध्या देश करत आहे. ही लाट ओसरण्याच्या आत आणखी एक काळजीची बातमी आहे. तब्बल 29 देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट लॅम्ब्डा (Lambda)  आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ही अपडेट माहिती दिली आहे. पेरू (Peru) देशामध्ये हा व्हेरिएंट सगळ्यात पहिल्यांदा आढळला होता. दक्षिण अमेरिकेत रुग्णांच्या वाढत्या संख्येला हा व्हेएरिएंट जबाबदार असल्याचे मानले जात आहे. WHO च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरु देशात या व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रभाव आहे. पेरुमध्ये एप्रिल 2021 पासून आजवर 81 टक्के कोरोना रुग्ण या व्हेरिएंटशी संबंधित आहेत. तर चिलीमध्ये गेल्या दोन महिन्यात याच्याशी संबंधित 32 टक्के रुग्ण आढळले आहेत. अर्जेंटीना आणि इक्वेडोर देशांमध्येही याचे रुग्ण आढळले आहेत. "लॅम्ब्डा व्हेरिएंटचा शरीरिरातील अँटीबॉडीवरही काही परिणाम होत नाही. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी याचा जास्त अभ्यास करण्याची गरज आहे." असे WHO च्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. कोणत्याही व्हायरसमुळे संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले की तो व्हायरस अधिक चिंताजनक मानला जातो. या व्हेरिएंटचा तपास, त्यावर उपचार आणि नंतर लस या माध्यमातून याचा धोका कमी होतो, असं वैज्ञानिक सांगतात. 48 तासांत काळे पडले, 42 दिवसांत Black fungus मुळे चिमुकल्यांनी गमावले डोळे हा व्हेरिएंट जगभर पसरण्याची भीती WHO नं व्यक्त केली आहे. सध्या डेल्टा व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 11 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. याचे कारण डेल्टा व्हेरिएंट मानले जात आहे. ब्रिटनमध्ये फेब्रुवारीच्या अखेरपासून आजवरचे सर्वाधिक 8,125 रुग्ण गेल्या 24 तासांमध्ये आढळले आहेत. इंग्लंडमधील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये गेल्या आठवडाभरात डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजारांनी वाढून 42,323 झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: