शेवटच्या टप्प्यात असलेली कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार? WHO ने सांगितलं...

शेवटच्या टप्प्यात असलेली कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार? WHO ने सांगितलं...

भारतात भारत-बायोटेक कंपनीने लस तयार केली असून सध्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : कोरोनाचा संसर्ग ऑगस्ट महिन्यात झपाट्यानं वाढताना दिसत आहे. कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जगभरात कोरोना व्हायरसवरील लशीच्या चाचण्या सुरू आहेत. जगभरात एकूण 165 लशींवर काम सुरू असून त्यापैकी 26 लशींची ह्युमन ट्रायल चालू आहे. कोणती लस यशस्वी होऊन बाजारात उपलब्ध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोरोनाची लस 2021 वर्षाच्या सुरुवातील येईल असा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे. कोरोनाची लशी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात असल्यानं ही लस तयार आहे असं म्हणता येणार नाही. कारण अजूनही मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण व्हायचा आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

सर्वांना प्रतीक्षा आहे ती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेल्या लशीची. त्यावरील क्लिनिकल चाचण्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू आहेत. ऑक्सफोर्ड प्रोजेक्टमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भागीदार आहे. कोरोना लशीवर प्रथम काम सुरू करणार्‍या अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने पहिल्या दोन टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत, ज्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. याची तिसरी चाचणी 27 जुलैपासून सुरू झाली आहे.

हे वाचा-प्रतीक्षा संपली! दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना लस

भारतात भारत-बायोटेक कंपनीने लस तयार केली असून सध्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू आहे. जगभरात सध्या 1 कोटी 97 लाख कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आहेत. थोड्याच दिवसात हा आकडा 2 कोटी होऊ शकतो. मात्र अद्यापही कोरोनावर लस (Vaccine) मिळालेली नाही आहे.

जगभरातील सर्वच देश कोरोनाची लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार जगभरात 21 हून अधिक लशीच्या क्लिनिकल ट्रायल केल्या जात आहे. एकीकडे जगभरातील तज्ज्ञ त्यांच्या लशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात आहेत, तर रशियाने ही लस तयार असल्याचा दावा केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 10, 2020, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading