Home /News /coronavirus-latest-news /

आता नाकावाटे मिळणार कोरोना लस; भारतात दिल्या जाणाऱ्या Sputnik V ची Nasal Vaccine तयार

आता नाकावाटे मिळणार कोरोना लस; भारतात दिल्या जाणाऱ्या Sputnik V ची Nasal Vaccine तयार

फोटो सौजन्य - ट्विटर @sputnikvaccine

फोटो सौजन्य - ट्विटर @sputnikvaccine

Sputnik V Nasal vaccine : नाकावाटे दिली जाणारी जगातील पहिली कोरोना लस रजिस्टर केल्याचा दावा रशियाने केला आहे.

    मॉस्को, 01 एप्रिल : इंजेक्शन म्हटलं की लहान मुलंच नव्हे तर मोठ्या माणसांनाही भीती वाटते. इंजेक्शनच्या भीतीपोटीही काही लोक कोरोना लस घेत नाही आहेत. पण आता लवकरच नाकावाटेही कोरोना लस दिली जाण्याची शक्यता आहे. भारतात आधीपासून दिली जात असलेल्या स्पुतनिक V लशीची नझल व्हॅक्सिन म्हणजे नाकावाटे दिली जाणारी लस तयार झाली आहे (Sputnik V Nasal vaccine). रशियाची स्पुतनिक V लस भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत दिली जात आहे. बऱ्याच लोकांना ही लस देण्यात आली आहे. इंजेक्शन स्वरूपात असलेलली ही लस आता नझल स्वरूपात उपलब्ध झाली आहे. आपण जगातील पहिली नझल व्हॅक्सिन तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या लशीची नोंदणीही केली आहे. भारतात आधीपासून या लस वापरात आहे. त्यामुळे या इंजेक्शनसोबतच आता नझल वॅक्सिनला भारतात परवानगी मिळणार का? आणि मिळाली तर ती कधीपासून दिली जाईल. याचीच प्रतीक्षा आता सर्वांना आहे. हे वाचा - मास्क की No mask, Local प्रवासाचं काय, Gudi padwa कसा साजरा करायचा?; सर्व प्रश्नांची उत्तरं इथं पाहा भारतातही एक नझल वॅक्सिन तयार करण्यात आली आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. पण या लशीची अद्याप चाचणी सुरू असून सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या