मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Fake Vaccination मोहिमेत महिला खासदार अडकली; स्वत: घेतली लस आणि नागरिकांनाही केलं आवाहन

Fake Vaccination मोहिमेत महिला खासदार अडकली; स्वत: घेतली लस आणि नागरिकांनाही केलं आवाहन

शेवटी महिला खासदारामुळेच या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला.

शेवटी महिला खासदारामुळेच या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला.

शेवटी महिला खासदारामुळेच या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला.

कलकत्ता, 24 जून : कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी देशभरात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार  मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) बनावटी लसीकरणाच्या शिकार झाल्या आहेत. स्वत: IAS अधिकारी असल्याचं सांगून या व्यक्तीने खासदाराला बनावटी लस दिली.

बनावटी लसीकरण मोहीमेत कशा अडकल्या खासदार?

टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी सांगितलं की, त्यांना लसीकरण शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना सांगण्यात आलं होतं की, कलकत्ता म्युनिसिपट कॉर्पोरेशनचे सहआयुक्तांच्यावतीने ट्रान्सजेंडर आणि अपंगांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. आयएएस अधिकारी असल्याचं सांगून तत्सम व्यक्तीने त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मी तेथे गेले आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी लसीकरण केलं.

कसा झाला खुलासा?

मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी सांगितलं की, कोरोना लस (Corona Vaccine) लावल्यानंतर जेव्हा मला कोणताही मेसेज आला नाही, तेव्हा मी लसीकरण प्रमाणपत्राबाबत विचारलं. तीन-चार दिवसात मिळेल, असं त्यावेळी मला सांगण्यात आलं. तेव्हा मला शंका आली, यानंतर मी लसीकरण थांबवलं आणि पोलिसांना याची सूचना दिली.

हे ही वाचा-ओम लसीकरणाय नम:! मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन

कलकत्ता साउथ डिव्हिजनचे जीसी राशिद मुनीर खान यांनी सांगितलं की, या प्रकरणात आरोपी देबांजन देब याला अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितलं की, लशींच्या मात्रेची खरेदी आरोग्य भवनाबाहेर आणि बागरी बाजारात केली. तरी या लशी तपासासाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यातून नेमका प्रकार लक्षात येईल. देबांजन देबने स्वत: आयएएस असल्याचा दावा केला होता आणि मिमी चक्रवर्ती यांना शिबिरात आमंत्रित केलं होतं.

First published:

Tags: Corona vaccination, Kolkata, Mp, TMC