पुरुषांच्या तुलनेत कोरोनाचे नियम पाळण्यात महिलाच आघाडीवर, संशोधकांचा दावा

पुरुषांच्या तुलनेत कोरोनाचे नियम पाळण्यात महिलाच आघाडीवर, संशोधकांचा दावा

तुम्हाला काय वाटतं खरच महिलांच्या तुलनेत पुरुष कोरोनाचे नियम पाळत नाहीत?

  • Share this:

न्यूयॉर्क, 08 ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपचार घेऊन नुकतेच व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. परत आल्यानंतर कॅमेरासमोर तोंडावरचा मास्क काढला. यावरून जगातील पुरुषांच्या मानसिकतेचं दर्शन घडलं. स्रियांच्या तुलनेत पुरुष मास्कचा वावर देखील कमी करत असल्याचं समोर आलं आहे. अनेक तज्ज्ञांनी सांगून देखील पुरुष या गोष्टींचं पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करताना पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. संशोधनात देखील ही गोष्ट समोर आली आहे.

न्यूयॉर्क विद्यापीठ आणि येल विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. बिहेव्हिअरल सायन्स अँड पॉलिसी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधनाचे प्रमुख आणि न्यूयॉर्क विद्यापीठातील सायकॉलॉजी विभागातील संशोधक इर्माक ऑक्लेसॉय ऑक्टेन यांनी याविषयी माहिती दिली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले,' कोरोना महामारीच्या आधी केलेल्या संशोधनात महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नेहमी डॉक्टरकडे जात असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर आता आम्ही केलेल्या या संशोधनात महिला आरोग्याप्रती सावध असल्याचं समोर आलं आहे.

वाचा-कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसात तयार होणाऱ्या जेलमुळे नव्या उपचारांना दिशा- संशोधन

या संशोधनात त्यांना आढळून आलं की, या कोरोनाच्या संकटात सुरक्षित राहण्यासाठी महिला जास्त काळजी घेताना दिसून येत आहे. पुरुष या तुलनेत खूप मागे आहेत. महिला कोरोना संदर्भातील सर्व सुरक्षा सूचनांचं पालन करताना दिसून येत आहेत. यामध्ये मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर मेडिकल तज्ज्ञांनी दिलेली माहिती योग्य प्रकारे आचरणात आणण्यात पुरुषांच्या तुलनेत महिलाच आघाडीवर आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या काळात पुरुष बेजबाबदार झाल्याचं दिसून येत आहे.

वाचा-कोरोनाचा कोरोनाशी लढा; गंभीर विषाणूला रोखतोय Common cold corona

पुरुषांना मास्क घालण्याविषयी विचारण्यात आलं असता त्यांचं उत्तर फारच विचित्र होतं असं अनेक व्हिडिओंमध्ये बघायला मिळालं आहे. त्यामुळे पुरुष याबाबत अजिबात गंभीर नसल्याचं देखील समोर आलं आहे. या संशोधनात संशोधकांनी जवळपास 800 अमेरिकी नागरिकांना याबाबत प्रश्न विचारले. यामध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हँडवॉश आणि सॅनिटायझचा वापर यांसारखे प्रश्न विचारले होते. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक सावध आणि काळजी घेत असल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर GPS लोकेशनच्या माध्यमातून देखील जवळपास 3 हजार नागरिकांवर लक्ष ठेवून ते कसे वागतात याचं निरीक्षण केलं गेलं.यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला सोशल डिस्टन्सिंग पाळत असल्याचं आणि मास्कचा वापर करत असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या