Home /News /coronavirus-latest-news /

अक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी!

अक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी!

लग्नसमारंभ रोखण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यानं अजब आदेश दिला आहे. आदेशानुसार, अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya) विवाह (Marriage) समारंभाचं आयोजन झाल्यास अंगणवाडी कार्यकर्त्यांना कामावरुन काढून टाकण्यात येईल तर सुपरवायजरला निलंबित करण्यात येईल

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 14 मे : दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर अनेकजण लग्नगाठ बांधत असतात. मात्र, यंदा देशात कोरोनानं (Coronavirus) अक्षरशः हाहाकार घातला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown) तसंच कर्फ्यूची घोषणा केली आहे. तर, काही राज्यांनी लग्नसमारंभांचं (Marriage) आयोजन करण्यास नकार दिला आहे. मध्य प्रदेशातही अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे, तर काही ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. अशा काळात लग्नसमारंभ रोखण्यासाठी बेरसियाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यानं अजब आदेश दिला आहे. या आदेशानुसार, या काळात विवाह समारंभाचं आयोजन झाल्यास अंगणवाडी कार्यकर्त्यांना कामावरुन काढून टाकण्यात येईल तर सुपरवायझरला निलंबित करण्यात येईल. कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय बेरसिया एकात्मिक बालविकास प्रकल्प क्रमांक १ च्या महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी मृदुल मालवीय यांनी आपल्या आदेशानुसार पर्यवेक्षकाला कामगारांमार्फत आपापल्या क्षेत्रात होणाऱ्या विवाहांविषयीची माहिती एकत्रित करण्यास सांगितलं आहे. त्यांनी आपली जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असल्याचं सांगत म्हटलं, की बेरसिया तृतीयाच्या दिवशी विवाहसोहळे आयोजित झाले तर यासाठी अंगणवाडी कार्यकर्ते आणि सुपरवायजर जबाबदार असतील. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी कामगारांनी नोकरीवरुन काढण्यात येईल. तर, सुपरवायजरला निलंबित करण्यात येईल, असं म्हटलं गेलं आहे. कोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल? संशोधनातून महत्त्वपूर्ण खुलासा बेरसिया तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी आधीच महिला व बालकल्याण विभाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, की बालविवाह आणि सामूहिक विवाह समारंभ आयोजित होण्याआधीच थांबवा. याच पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona virus in india, Lockdown, Marriage

    पुढील बातम्या