भरतपूर, 23 जानेवारी: कोरोनामुळे संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जीवितहानी तर झालीच आहे पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी देखील झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर तर आणखी एक धक्का जगाला बसला होता. दरम्यान आता प्रत्येक राष्ट्र कोरोनाच्या परिस्थितीतून सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान राजस्थानमधून कोरोना केसेसमधील एक विचित्र प्रकार समोर येत आहे. याठिकाणी एक महिला गेल्या 5 महिन्यांपासून कोरोनाशी झुंज देत आहे. अपना घर या आश्रमातील ही महिला आहे जी 4 सप्टेंबर 2020 रोजी पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. मात्र अजूनही त्या कोरोनाशी लढत आहेत. 5 महिन्यांपासून ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. या प्रकारामुळे डॉक्टर देखील चक्रावून गेली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यात ही महिला तब्बल 31 वेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. 31 वेळा करण्यात आलेली या महिलेची कोरोना चाचणी दरवेळी पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
(हे वाचा-ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमानाचा फोटो शेअर करुन मानले मोदींचे आभार!)
शारदा देवी असं या महिलेचं नाव असून त्या अपना शहर या आश्रमात राहतात. त्यांना आई-वडील नाही आहेत. सासरच्यांनी देखील त्यांना घराबाहेर काढल्यानंतर 'अपना घर'ने त्यांना सहारा दिला. पण तत्पूर्वी त्यांची संप्टेंबरमध्ये कोरोना टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचा पहिला अहवाल 4 सप्टेंबर रोजी आला होता. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. त्यांनी अपना घर आश्रमाचे संचालक डॉ. बी एम भारद्वाज यांचा हवाला देत म्हटलं आहे की या महिलेची 31 वेळा पॉझिटिव्ह आलेली कोरोना चाचणी गंभीर विषय आहे. दरम्यान त्यांचं वाढलेलं वजनही चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जयपूर याठिकाणी पाठवण्यात येणार आहे.