Home /News /coronavirus-latest-news /

लशीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी आहेत? पुण्यातील सीरम कंपनीच्या मालकांचा सवाल

लशीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी आहेत? पुण्यातील सीरम कंपनीच्या मालकांचा सवाल

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

आदर पुनावाला यांनी ट्विट करत, भारतातील एकूण लसीकरणासाठी 80 हजार कोटी खर्च येणार असल्याचे म्हटलं जात असल्याचे सांगितले.

    नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus Pandemic) संख्या वाढत असताना भारता पुढील आव्हान आला कोरोनावरील लस (Corona Vaccine) आहे. याबाबत बोलताना सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India- SII) सीईओ आदर पुनावाला (CEO Adar Poonawalla) यांनी सरकार कोरोना लस विकत घेण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यासाठी लागणारे 80 हजार कोटी आहेत का? असा प्रश्न विचारला आहे. आदर पुनावाला यांनी ट्विट करत, भारतातील एकूण लसीकरणासाठी 80 हजार कोटी खर्च येणार असल्याचे म्हटलं जात असल्याचे सांगितले. त्यामुळे केंद्रिय आरोग्य मंत्रालयारकडे पुढील वर्षभरासाठी 80 हजार कोटी आहेत का? कारण देशाच्या प्रत्येक भागात ही लस पोहचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. हे ट्वीट करताना पुनावाला यांनी केंद्रिय आरोग्य मंत्रालय आणि पंतप्रधान ऑफिस यांना टॅग केले आहे. वाचा-लस येईपर्यंत जगात काय असेल स्थिती? कोरोनाबाबत WHO नं दिला धोक्याचा इशारा वाचा-ऑक्सफोर्ड लशीबाबत मोठी बातमी! मुंबईच्या KEM रुग्णालयात 3 जणांना दिला डोस सीरम इंस्टीट्युट करत आहे लशीचे उत्पादन पुणे येथील सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया लस आणि डोस उत्पादनाच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे, जी नवीन कोरोनाच्या लसींवर काम करत आहे. त्यांच्या संभाव्य लशींमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका (Astrazeneca)-ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) लशीचा समावेश आहे, जी मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन करत आहे. भारतात सीरम कंपनी या लशीचे उत्पादन करणार आहे. वाचा-'संशोधन योग्य ठरल्यास डेंग्यूची लस ठरेल कोरोनावर प्रभावी', शास्त्रज्ञांचा दावा कोण आहेत आदर पुनावाला आदर पुनावाला सध्या सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. त्यांचे वडील डॉ. सायरस पुनावाला यांनी 1966मध्ये सीरम इंस्टीट्युटची स्थापना केली. ही कंपनी पुनावाला ग्रुपचा भाग आहे. आदर पुनावाला यांनी युकेच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून शिक्षण घेतले. 2001 मध्ये आदर पुनावाला वडिलांच्या कंपनीत रुजू झाले. असे मानले जाते की त्यांनी सीरम संस्थेच्या वाढीस आणि त्यातील आंतरराष्ट्रीय वाढीसाठी त्यांनी खूप हातभार लावला. 2011 मध्ये ते कंपनीचे सीईओ झाले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या