पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री ठाकरे करणार का लॉकडाऊनची घोषणा?

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री ठाकरे करणार का लॉकडाऊनची घोषणा?

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन नको ही भूमिका घेतली आहे.आता मुख्यमंत्री ठाकरे काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : 'लॉकडाऊन (Lockdown) हा शेवटचा पर्याय असावा' पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी अशी भूमिका मांडत लॉकडाऊन नको, असा सल्ला दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra Locdown) बाबत राज्यसरकार आपला निर्णय रद्द करणार की  कायम ठेवणार याकडे लक्ष लागले.

राज्यात करोनाची वाढती संख्या कमी होत नाहीये. या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने उद्यापासून कडक लॉकडाऊन लागू होणार याबाबतची घोषणा केली आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले. ही घोषणा होते न होते तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे.

35 हजारात remdesivir injection चे इंजेक्शन, वसईत धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश

यात लॉकडाऊन देशाला परवडणारे नाही, त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका जाहीर केली. त्याच बरोबर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवा ही भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी पाहता राज्यसरकार स्वतःचा लॉकडाऊन बाबत घेतलेल्या निर्णय वर ठाम राहत का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे, 40 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे, त्याच बरोबर देशात सर्वाधिक दैनंदिन मृत्यू महाराष्ट्रात आहेत, अशा परिस्थितीत राज्यात ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरची कमतरता भासत आहे. या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावावा याबाबत सर्वच मंत्र्यांनी भूमिका घेतली. अखेर मंत्रिमंडळात याबाबत निर्णय झाला. आता मुख्यमंत्री ठाकरे काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एनसीबी चौकशीत Drug पेडलरचा धक्कादायक खुलासा

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन नको ही भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्टीने सर्वात मोठ राज्य आहे, तसंच देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. जर महाराष्ट्रात लॉकडाऊन झाला तर त्याचे आर्थिक पडसाद सर्वच राज्यात दिसू लागतीळ हे नक्की. उद्योगपती, परराज्यातील कामगार या सर्वांचं दडपण राज्य सरकारवर राहणार आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष राहणार हे स्पष्ट आहे.

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 7:35 AM IST

ताज्या बातम्या