मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आपल्या देशी परतली पत्नी; भारतात हॉटेलच्या खोलीत पडून राहिला पतीचा मृतदेह

आपल्या देशी परतली पत्नी; भारतात हॉटेलच्या खोलीत पडून राहिला पतीचा मृतदेह

पत्नीला कर्करोग झाल्या असल्याने दोघे भारतात उपचारासाठी आले होते. मात्र...

पत्नीला कर्करोग झाल्या असल्याने दोघे भारतात उपचारासाठी आले होते. मात्र...

पत्नीला कर्करोग झाल्या असल्याने दोघे भारतात उपचारासाठी आले होते. मात्र...

    नवी दिल्ली, 2 मे : मध्य दिल्लीच्या नबी करीम येथील एका हॉटेलमध्ये अफगणिस्तान सेनाच्या निवृत्त मेजर जनरलचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी अफगणिस्तानमधील त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला तेव्हा कुटुंबीयांनी भारतात येणे शक्य नसल्याचं सांगितलं. यानंतर अफगणिस्तान दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिल्ली पोलिसांनी दिल्ली गेट स्थित स्मशानभूमीत वयस्कर मोहम्मद रहीम वर्धक यांच्यावर अंत्यसंस्कार केले. ही वयस्कर व्यक्ती 20 मार्चपासून नबीव करीम येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. ते आपल्या पत्नीवर उपचार करण्यासाठी दिल्लीला आले होते. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रहीम यांची पत्नी 24 एप्रिल रोजी आपल्या देशी परतल्या. मिळालेल्या माहितीनुसार रहीम वर्धक यांची पत्नी या कर्करोगाने पीडित होत्या. 20 मार्च रोजी पत्नीसह ते भारतात आले होते. येथे अपोलो रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. तेव्हापासून रहीम हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान 20 एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. हे ही वाचा-कोरोनाग्रस्त वडिलांची ऑक्सिजन पातळी खालावली;ICU मधील मुलाने बापासाठी बेड दिला मात्र रहीम यांनी चाचणी करणं टाळलं. कारण 24 एप्रिल रोजी त्यांना आपल्या घरी परतायचं होतं. यादरम्यान 23 एप्रिल रोजी हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. रहीम यांच्या पत्नीने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी बातचीत होऊ शकली नाही. त्यानंतर रहीम यांची पत्नी दूतावासाच्या मदतीने 24 एप्रिल रोजी आपल्या घरी परतल्या. येथे सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी रहीम यांचा मृतदेह ताब्यात घेतला. अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दूतावासाच्या मदतीने पोलिसांनी रहीम यांच्या कुटुंबाशी संपर्क केला. यावेळी रहीमचा मुलगा नासिर याने भारतात येता येणार नसल्याचं सांगितलं. आणि वडिलांना तेथेच दफन करण्यास सांगितलं. दूतावास अधिकारी अतीकुर्हहमान यांच्या उपस्थितीत पोलिसांनी 27 एप्रिल रोजी रहीम यांना भारतातचं दफन केलं. रहीम अफगणिस्तान सैन्याचे मोठे अधिकारी राहिले होते. त्यांना अनेक मेडलही मिळाले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona patient, Corona updates, Delhi

    पुढील बातम्या