Coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विस्फोटानं देश चिंतेत, अचानक का बिघडली परिस्थिती?

Coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विस्फोटानं देश चिंतेत, अचानक का बिघडली परिस्थिती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही म्हटलं, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Covid 19) देशावर एखाद्या वादळाप्रमाणे परिणाम केला आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्यामागे राजकारण्यांचाही हात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 23 एप्रिल : भारतात कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार आणखी वेगानं होऊ लागला आहे. मागील 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे नवे 3.14 लाख रुग्ण आढळले आहेत. जगभरात पहिल्यांदाच एखाद्या देशात एकाच दिवसात इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान 2,102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या झपाट्यानं होणाऱ्या या प्रसारानं देशासमोर आरोग्य संकट उभा केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही म्हटलं, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Covid 19) देशावर एखाद्या वादळाप्रमाणे परिणाम केला आहे.

देशात 4 एप्रिलला कोरोनाचे जवळपास 1 लाख रुग्ण समोर आले होते. यानंतर बरोबर सतरा दिवसांनी म्हणजेच बुधवारी 3 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान कोरोना रुग्णसंख्येत दररोज 6.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेपेक्षा भारतात हा विषाणू चार पटीनं झपाट्यानं पसरत आहे.

इतकी का बिघडली परिस्थिती - मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोना पीकवर होता. यानंतर जवळपास 30 आठवडे रुग्णसंख्येत सलग घट आली. यानंतर यंदाच्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्याचं पाहायला मिळालं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. लोकांचा असा समज झाला की, कोरोना आता पुन्हा वाढणार नाही. तज्ज्ञ असंही म्हणतात, की भारत आपल्या आरोग्याच्या सेवेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास अपयशी ठरला आहे. मिशिगन युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्रज्ञ आणि एपिडिमोलॉजिस्ट प्रोफेसर भृमर मुखर्जी यांनी सांगितले की, “आपण यशाच्या अगदी जवळ गेलो होतो.”

ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक निकोलाई पेट्रोव्हस्की म्हणाले की, लोक असा विचार करू लागले की आपण यातून वाचलो आहोत. विशेषतः इतर देशांप्रमाणे भारतानं मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तितकं काम केलं नाही. ते म्हणाले, 'आता आपण नक्कीच एका मोठ्या समस्येने वेढले आहोत. देशातील सर्व चांगल्या स्रोतांचा वापर करुनही रातोरात 1.2 अब्ज लसीकरण करता येत नाही.

केरळमधील राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सचे प्रोफेसर रिजो एम जॉन यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचं कारण राजकीय नेत्यांची बेजबाबदार विधानं असल्याचंही म्हटलं आहे. ते म्हणाले, की पहिल्या लाटेमध्ये केस कमी येताच काही राजकीय नेत्यांच्या विधानांनी नागरिकांची दिशाभूल केली. लोकांना असा विश्वास दिला, की आता ते सुरक्षित आहेत. लोकांना हे सांगण्यात आलं, की भारतानं कोरोनाला हरवलं आहे. यानंतर लोकांनी हलगर्जीपणा केला.

Published by: Kiran Pharate
First published: April 23, 2021, 8:26 AM IST

ताज्या बातम्या