महाराष्ट्रात का वाढवला Lockdown? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा!

महाराष्ट्रात का वाढवला Lockdown? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा!

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे काही नियम लादणे आवश्यक आहे. मात्र सरकार अनलॉक करण्याचाच प्रयत्न करत आहेत.

  • Share this:

मुंबई 29 जून: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत Lockdown वाढविण्यात आला आहे. (Maharashtra extends lockdown) याला सरकारने Unlock असं म्हटलेलं आहे. त्यामुळे काही निर्बंधांसह जिल्ह्यात व्यवहार सुरू राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनीही निर्बंध कायम राहण्याचेच संकेत दिले होते. लोक नियमांचं पालन करत नाहीत. अनावश्यक घराबाहेर निघतात त्यामुळेच असे निर्णय घ्यावे लागतात असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केला आहे. लोकांनी निष्काळजी राहू नये असं आवाहनही त्यांनी केलं.

टोपे पुढे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे काही नियम लादणे आवश्यक आहे. मात्र सरकार अनलॉक करण्याचाच प्रयत्न करत आहेत. आता फारसे निर्बंध नाहीत. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचं आहे. त्यासाठीच नियमांचं पालन केलं पाहिजे.

महाराष्ट्रत (Mharashtra) लॉकडाउन (Lockdown) 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. Unlock झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. (Lockdown in Maharashtra Extended till 31 July) या नव्या लॉकडाउनला सरकारने Mission Begin Again असं नावं दिलं आहे.

Good News: 10 जुलैपासून सरकार आणणार COVID Insurance Policy, असे असतील नियम

MMRDA परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

कोरोनाशी लढा - जगातील सर्वात मोठं Plasma Therapy Trial महाराष्ट्रात होणार

अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यासा परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 29, 2020, 6:22 PM IST

ताज्या बातम्या