Home /News /coronavirus-latest-news /

Corona चे संकट अजूनही संपलेले नाही, तरीही का हटवले जातायंत निर्बंध? हे आहे कारण

Corona चे संकट अजूनही संपलेले नाही, तरीही का हटवले जातायंत निर्बंध? हे आहे कारण

कोरोनाची तिसरी लाट आता काहीशी ओसरत असल्याचं दिसत असलं तरी रुग्णसंख्या मोठी आहे. लसीकरण, विषाणू संसर्गानंतर रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण कमी असणं, मास्क, सुरक्षित अंतर, स्वच्छता यांसारखे उपाय, तसंच अन्य निर्बंध यांमुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 02 फेब्रुवारी: कोरोना विषाणूच्या (Coronavirus Latest Updates) नव्या ओमिक्रॉन (Omicron Latest News) या प्रकाराचा संसर्ग अत्यंत वेगानं होत असल्यानं रुग्णसंख्या प्रचंड वाढली आणि जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) पसरली. आता ही तिसरी लाट आता काहीशी ओसरत असल्याचं दिसत असलं तरी रुग्णसंख्या मोठी आहे. लसीकरण, विषाणू संसर्गानंतर रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण कमी असणं, मास्क, सुरक्षित अंतर, स्वच्छता यांसारखे उपाय, तसंच अन्य निर्बंध यांमुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी कोरोना विषाणू संसर्ग हा सामान्य आजार मानून, जनतेवरचे निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. यात डेन्मार्क (Denmark) आघाडीवर असून, कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं असूनही तिथल्या सरकारनं मास्क घालण्यासह सर्व कोरोना निर्बंध हटवले आहेत. असं करणारा तो पहिला युरोपीय देश ठरला आहे. डेन्मार्कसह इतर अनेक देशांनीही निर्बंध हटवण्यासाठी पावलं उचलली असून, आपल्या देशातही (India Coronavirus Latest News) त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले आहेत. शाळा सुरू करण्यात येत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, ऑफिसेस अशा ठिकाणी उपस्थितीबाबत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रचारासाठी शिथिलता दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नसताना देखील हे देश निर्बंध का हटवत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचं उत्तर जाणून घेऊ या. हे वाचा-तरुणाने अवघ्या 16 सेकंदासाठी मास्क काढलं अन् झालं लाखोंचं नुकसान; काय आहे प्रकरण डेन्मार्कमध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले असून, तिथं आता मास्क घालण्याचीही गरज नाही. नाइट क्लबदेखील उघडण्यात आले असून, तिथं प्रवेशासाठी अॅपची आवश्यकता नाही. तिथलं जनजीवन आता पूर्वीप्रमाणे सामान्य झालं असल्याचं बीबीसीनं म्हटलं आहे. डेन्मार्कपाठोपाठ ब्रिटनमध्येही (Coronavirus in Britain) कोरोना निर्बंध हटवण्यात येत असून, तिथं मास्कची सक्ती रद्द करण्यात आली आहे. कोविड पासची अट रद्द करण्यात आली असून, सर्व जण कार्यालयात जाऊन काम करू लागले आहेत. इतरही अनेक निर्बंध हटवण्याचा विचार केला जात आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत लॉकडाउन असलेल्या नेदरलँड्सनेही (Netharland Coronavirus Update) बहुतांश निर्बंध हटवले जात आहेत, तर स्पेनमध्ये कोरोना हा सामान्य फ्लू म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोना निर्बंध हटवण्यामागे काय आहे कारण? इतक्या देशांमध्ये कोरोनाबाबतचे निर्बंध हटवण्याचा हा निर्णय घेण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे जगातल्या मोठ्या लोकसंख्येने लशीचे दोन डोसेस घेतले आहेत. दुसरं म्हणजे ओमिक्रॉन हा प्रकार अधिक धोकादायक मानला जात नाही. त्यामुळे अनेक देशांनी याला एक एन्डेमिक (Endemic) म्हणजेच प्रदेशनिष्ठ आजार मानण्यास सुरुवात केली आहे. एन्डेमिक (What is Endemic) हा शब्द अशा आजारांसाठी वापरला जातो, ज्यांपासून एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट वर्गात नियमितपणे सुटका मिळणे कठीण असते. उदाहरणार्थ, मलेरिया अनेक देशांमध्ये एन्डेमिक आजार आहे, म्हणजेच तिथे त्यापासून कायमची सुटका होणं कठीण आहे. तिथल्या नागरिकांना या आजारासहच जगावं लागतं. हे वाचा-'Omicron चा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात', WHO नं सांगितलं कारण कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार आता फारसा धोकादायक मानला जात नाही. कारण त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे आता त्याच्यासोबत पुढे जाण्याची मानसिकता तयार होत आहे. आता यापुढे या विषाणूसोबतच जगायचं आहे, असं अनेक जण गृहीत धरू लागले आहेत. अलीकडेच ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले होते, की 'कोरोना कुठेही जात नाही. तो आपल्यासोबत अनेक वर्षं किंवा कायमचा राहणार आहे. आम्ही तो साथीच्या आजारातून एन्डेमिक पातळीवर आणण्यासाठी काम करत आहोत. कोविडसोबत कसं जगता येतं, हे आम्ही जगाला हे दाखवणार आहोत.' जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ या संकटाशी सामना केल्यानंतर आता सगळं जग कोरोना विषाणूला आणि त्यामुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराला आयुष्याचा एक भाग मानून पुढे वाटचाल करण्याची तयारी करत आहे. त्यामुळेच आता कोरोनाबाबतचे निर्बंध हटवून जनजीवन कोरोनापूर्व काळाप्रमाणे सर्वसामान्य करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या