मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा का नाही? केंद्राने सांगितलं कारण

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा का नाही? केंद्राने सांगितलं कारण

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आकडेवारी मागवली होती, परंतु केवळ पंजाब आणि अरुणाचल प्रदेशनेच उत्तर दिले.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 04 डिसेंबर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कोरोना संसर्गाचा (Coronavirus in India) मुद्दा गाजला. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of Coronavirus) ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंची (Death due to Lack of Oxygen) आकडेवारी केंद्र सरकारकडे का नाही, याचे उत्तर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत दिले. ते म्हणाले, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आकडेवारी मागवली होती, परंतु केवळ पंजाब आणि अरुणाचल प्रदेशनेच उत्तर दिले.

एका लेखी उत्तरात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, पंजाबने अमृतसर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करणारा ईमेल पाठवला आहे.

ते म्हणाले, 'या विषयावरील डेटासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 29 नोव्हेंबर 2021 रोजी ईमेल पाठवण्यात आला आहे.' परंतु उत्तर फक्त पंजाब आणि अरुणाचल प्रदेशातून आले आहे. त्यांनी असंही सांगितलं की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूच्या अहवालासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि त्यानुसार ते नियमितपणे नवी प्रकरणे आणि मृत्यूची नोंद मंत्रालयाला करतात.

आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, भारतात कोरोनामुळे 4.6 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. नोंदवल्या गेलेल्या कोरोना प्रकरणांपैकी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1.36 टक्के आहे. ते म्हणाले की, भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 5,000 प्रकरणे आणि 340 मृत्यूची नोंद झाली आहे. हे जगातील सर्वात कमी असणाऱ्यातील एक आहे.

यापूर्वी सरकारने संसदेत सांगितलं होतं की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारने हा दावा केला आहे. तेव्हापासून विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला. यानंतर केंद्राने वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंबाबत पुन्हा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आकडेवारी मागवली.

First published:

Tags: Corona updates, Corona virus in india