नवी दिल्ली 24 जानेवारी : मागच्या काही दिवसांपासून देशात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त आढळत आहे. त्यातच ज्या ओमायक्रॉनमुळे जगभरात कोरोनाची त्सुनामी आली, तो व्हेरिएंट (Variant) भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन स्टेजमध्ये (Community Transmission Stage) पोहोचला आहे. ओमायक्रॉन (Omicron) हा डेल्टापेक्षा (Delta) कमी गंभीर असला तरी तो एक धोकादायक व्हायरस (Dangerous Virus) आहे, असं डब्ल्यूएचओच्या (WHO) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रविवारी सांगितलं.
WHOच्या कोविड-19 च्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria van Kerkhove) म्हणाल्या, “ज्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे, त्यांना असिम्प्टोटिक इन्फेक्शन, गंभीर आजार आणि मृत्यू होण्याचा धोका आहे. ज्यांना इतर आजार आहेत, ज्यांचं वय कमी आहे आणि ज्या लोकांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना ओमायक्रॉन झाल्यास ते गंभीर आजारी होऊ शकतात. ओमायक्रॉनची लागण झालेले अनेक पेशंट रुग्णालयात दाखल असून त्यांचे मृत्युही होत आहेत. आतापर्यंतच्या डेटानुसार ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा सौम्य असला तरी तो धोकादायक नक्कीच आहे.”
चिंता वाढवणारी बातमी, राज्यातल्या 'या' जिल्ह्यात आढळले Omicron चे तीन म्युटेशन
शेवटी प्रत्येकालाच ओमायक्रॉनची लागण होईल का, असं विचारलं असता त्यांनी इतर तीन व्हेरिएंटच्या प्रसाराची तुलना केली. त्यानुसार ओमायक्रॉन प्रसाराच्या बाबतीत डेल्टाला मागे टाकत असून लोकांमध्ये वेगाने पसरत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण याचा अर्थ त्याची लागण सर्वांनाच होईल, असं नाही, असं त्या म्हणाल्या.
“जगभरात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य प्रणालीवर मोठा ताण पडतोय. त्यातच आपण साथीच्या रोगाच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहोत. जर लोकांना आवश्यक असलेली योग्य काळजी घेता येत नसेल तर मोठ्या प्रमाणात लोकांना गंभीर आजार होतील आणि मृत्यू (death) देखील मोठ्या प्रमाणात होतील, हेच आम्ही रोखू इच्छितो,” असं मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या. तर, डब्ल्यूएचओ ओमायक्रॉनचं एक्सपोजर कमी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी पार्टनर्ससोबत काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
लसीकरण हे गंभीर रोग, मृत्यू, काही इंफेक्शन आणि पुढील संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विश्वसनीय उपाय आहेत, मात्र तो परिपूर्ण नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क परिधान करून, सुरक्षित शारीरिक अंतर राखणं, तोंड आणि हात धुणं, गर्दी टाळणं(avoiding crowds), घरून काम करणं (working from home), आवश्यकतेनुसार योग्य काळजी घेणं आणि चाचणी करून घेणं, या गोष्टी करणे आवश्यक आहे,” असं त्या म्हणाल्या.
“अनेक कारणांमुळे ओमायक्रॉनचा (Omicron ) प्रसार कमी करणं महत्त्वाचं आहे. सर्वांत आधी आम्ही लोकांना संसर्ग होण्यापासून वाचवू इच्छितो कारण त्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काही मार्ग आहेत, परंतु तरीही लोकांना हा रोग होण्याचा धोका आहे. आणि जर एखाद्याला कोणता आजार असेल किंवा वय जास्त असेल, लसीकरण केलेलं नसेल, तर कोरोना झाल्यानंतर ती व्यक्ती हाय रिस्क फॅक्टरमुळे (high-risk factor ) गंभीर आजारी होऊ शकते,” असं त्यांनी सांगितलं.
एकाच व्यक्तीला कितीवेळा Omicron ची लागण होऊ शकते; उत्तर सर्वांना घाबरवणारं आहे
“दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला पोस्ट-कोविड स्थिती किंवा लाँग कोविडचा प्रभाव पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे विषाणूची लागण झालेल्या लोकांना दीर्घकालीन परिणाम होण्याचा धोका असतो. याविषयी खूप काही समजून घेण्यासारखं आहे. पोस्ट-कोविड स्थिती विकसित होण्याचा धोका हा तुम्हाला संसर्ग होण्याच्या जोखमीवर अवलंबून असतो," असं त्यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या की “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (public transportation) सुरू आहेत, मार्केट सुरू आहेत त्यामुळे तिथं गर्दी होते आहे. त्याचा परिणाम म्हणून कोविड संसर्ग वाढतो आहे त्यामुळे हॉस्पिटल्सना (hospitals) पेशंटची संख्या नियंत्रित करणं कठीण होऊन बसलं आहे. ओमायक्रॉन जितका अधिक प्रसारित होतोय, तेवढ्याच वेगाने त्याचा प्रसार होण्याच्या संधी रोखल्या पाहिजेत. कारण हा विषाणू अनेक कारणांमुळे जगभरात आश्चर्यकारकपणे वेगाने मोठ्या पातळीवर फिरत आहे. व्हायरस जितका जास्त पसरतो, त्याला बदलण्याच्या म्हणजेच म्युटेट होण्याच्या तितक्याच जास्त संधी असतात," असं त्यांनी सांगितलं.
"ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसेल, ज्याबद्दल आपण चर्चा करत असू. भविष्यात कोरोनाचे आणखी चिंतादायक व्हेरिएंट उद्भवण्याची शक्यता आहे," असा इशारा त्यांनी दिला. "त्या व्हेरिएंटचे गुणधर्म काय असतील हे आम्हाला समजत नाही. नक्कीच, ते अधिक वेगाने संक्रमण होणारे असतील कारण त्यांना सध्या असलेल्या व्हेरिएंटना मागे टाकण्याची आवश्यकता असेल. ते कमी किंवा जास्त तीव्र होऊ शकतात. त्याशिवाय त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीपासून बचावाचे गुणधर्म देखील असू शकतात. अशा धोकादायक व्हेरिएंटचा जन्म होण्यापासून आम्हाला रोखायचा आहे,” असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, यूएस इम्युनोलॉजिस्ट अँथनी फाउसी (US immunologist Anthony Fauci ) म्हणाले, “ओमायक्रॉन अत्यंत संसर्गजन्य आहे, परंतु वरवर पाहता फारसा रोगजनक (pathogenic) नाही. पुढे देखील तो असाच राहील, असं वाटतंय. परंतु पुढे जाऊन त्याचे कोणते नवीन व्हेरिएंट येतील, यावर ते अवलंबून असेल."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona vaccination