Home /News /coronavirus-latest-news /

खाण्याच्या पॅकेटमधून तुमच्या घरामध्ये पोहोचतोय कोरोना? WHO ने दिले हे स्पष्टीकरण

खाण्याच्या पॅकेटमधून तुमच्या घरामध्ये पोहोचतोय कोरोना? WHO ने दिले हे स्पष्टीकरण

कोरोनाने (Coronavirus) गेले 3-4 महिने जगभरात थैमान घातले आहे. अद्यापही कोरोना कसा पसरतो याबाबात सामान्यांमध्ये संभ्रम आहे. खाण्यातून किंवा खाण्याच्या पॅकेटमधून कोरोना पसरतो का असा सवालही सामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.

    मुंबई, 16 ऑगस्ट : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाचे (Coronavirus) सावट आहे. दरम्यान कोरोनाबाबतची बरीच माहिती सोशल मीडियावर विविध हवाल्यांच्या आधारे शेअर केली जाते. कोरोनाबाबत अनेक संभ्रम देखील सामान्यांमध्ये निर्माण झाले आहे. या काळामध्ये खाण्याच्या पदार्थांची डिलिव्हरी देखील वाढली  आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाल्यानंतर भारतातील विविध भागातही खाण्याचे पदार्थ घरपोच पोहोचवले जात आहेत. अशावेळी खाण्यातून किंवा खाण्याच्या पॅकेटमधून कोरोना पसरतो असा सवाल सामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) स्पष्टीकरण दिले आहे. WHO च्या मते खाणे किंवा खाण्याच्या पॅकेटमधून कोरोना पसरतो याबाबत ठोस पुरावे मिळाले नाही आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने खाण्यातून कोरोना पसरतो अशा प्रकारची भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. आज तक ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. (हे वाचा-माणसं काय माकडांवरही चाचणी करणार नाही; रशियन कोरोना लशीची अमेरिकेने उडवली खिल्ली) जागतिक आरोग्य संघटनेच्या इमरजन्सी प्रोग्रामचे प्रमुख माइक रेयान यांनी असे आवाहन केले आहे. लोकांनी घाबरू नये, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे WHOच्या पँडेमिक तज्ज्ञ मारिया वॅन केरखोव (Maria Van Kerkhove) यांनी अशी माहिती दिली आहे की, चीनने लाखो पॅकेट्सची तपासणी केली आहे आणि यातून अगदी कमी पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली होती. मात्र ब्राझीलमधून आयात केलेल्या फ्रोजन चिकनची दोन शहरांमध्ये तपासणी केली असता व्हायरसची पुष्टी झाल्याचे चीनचे म्हणणे आहे. याशिवाय इक्वाडोरहून येणाऱ्या फूड पॅकेटवरही व्हायरस आढळून आले. (हे वाचा-कोरोनाच्या 3 लशी विविध टप्प्यात, भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची तयारी पूर्ण- PM) दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरस लशीसंदर्भात (Coronavirus Vaccine) सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. रशियाने जगातील सर्वात पहिली कोरोना लस (Russian corona vaccine) तयार केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लशीला स्पुतनिक व्ही (Sputnik V) असं नाव दिलं आहे.  या लशीसाठी 20 पेक्षा अधिक देशांकडून अब्जावधी डोसच्या ऑर्डर आल्या आहेत. त्यात भारताचही समावेश आहे. असं रशियाने याआधी सांगितलं आहे. मात्र चाचण्या पूर्ण न झाल्याने  लशीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेनंही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. त्यामुळे सर्व निकष गांभीर्याने तपासूनच ही लस भारतात दिली जाईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Who

    पुढील बातम्या