BREAKING - हवेतून पसरू शकतो CORONAVIRUS; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं मान्य

BREAKING - हवेतून पसरू शकतो CORONAVIRUS; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं मान्य

हवेतून पसरणाऱ्या कोरोनाव्हायरचा (airborne coronavirus) धोका लक्षात घेत WHO ने नव्या गाइडलाइन्सही जारी केल्यात.

  • Share this:

जीनिव्हा, 10 जुलै : कोरोनाव्हायरस हवेतून (Coronavirus airborne) पसरू शकतो हे जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मान्य केलं आहे. शास्त्रज्ज्ञांनी हवेतून पसरणाऱ्या कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेला पुरावे दिले त्यानंतर जागतिक आरोग्य संघनटेनं त्याची दखल घेतली आणि काही ठिकाणी हवेतून कोरोना पसरण्याचा धोका आहे, असं जागितक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

गर्दीच्या ठिकाणी, रेस्टॉरंट, फिटनेस क्लास तसंच एखाद्या बंद खोलीत बराच वेळ राहिल्याने कोरोनाव्हायरस पसरू शकतो ही शक्यता नाकारता येणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. हा धोका लक्षात घेत बचावासाठी जागतिक आरोग्य संगटनेनं नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

हवेतील कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी, रेस्टॉरंट, फिटनेस क्लासमध्ये जाणं टाळावं आणि वेंटिलेशनची चांगली सुविधा असलेल्या ठिकाणीचं जावं. तसंच आतापर्यंत जसं आपण मास्क घालत आलो, सोशल डिस्टन्सिंग ठेवत आलो त्याचं पालन करणंही खूप गरजेचं आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. या गाइडलाइन्स गांभीर्याने घ्याव्यात असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

हे वाचा - कोरोनाला रोखणाऱ्या धारावी मॉडेलची जगभरात चर्चा; WHO च्या अधिकाऱ्यांनी केलं कौतुक

कोरोनाव्हायरस हवेतून पसरू शकतो, हा दावा इतके दिवस जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळला होता. यानंतर संशोधकांनी याबाबत पुरावे सादर केले. जगातल्या 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी यासंर्भात WHOला पत्र लिहिलं आणि कोरोनापासून बचावाबाबतचे निकष बदलण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने घेतली.

हे वाचा - हवेतून पसरणारा Coronavirus किती धोकादायक?

हवेतून पसरणारा कोरोना म्हणजे संक्रमित व्यक्ती खोकताना, शिंकताना तर या व्हायरस पसरतोच मात्र जेव्हा ती व्यक्ती बोलते, श्वाच्छोवास करते तेव्हा हा व्हायरस हवेत जातो आणि हवेत बराच वेळ राहू शकतो.  एखादी निरोगी व्यक्ती कोरोना व्हायरस असलेल्या हवेत श्वास घेत असेल तर या हवेतील व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतात. शिवाय लक्षणं नसलेल्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. कारण कोरोना संक्रमित व्यक्तीच्या श्वासामार्फत व्हायरस हवेत पसरू शकतो.

Published by: Priya Lad
First published: July 10, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या