मास्क वापरण्याबाबत WHO ने नियम केले कठोर; पालन न केल्यास...

मास्क वापरण्याबाबत WHO ने नियम केले कठोर; पालन न केल्यास...

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी मास्क (Mask) वापरण्याबाबतच्या अधिक कठोर सूचना जारी केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : कोरोना विषाणूची (Corona Virus) दुसरी लाट तीव्र होण्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO) ने मास्क वापरण्याबाबत अधिक काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)  बुधवारी मास्क (Mask) वापरण्याबाबतच्या अधिक कठोर सूचना जारी केल्या आहेत. ज्या भागात कोविड 19 चा (Covid 19) संसर्ग पसरत आहे, तिथं असलेल्या आरोग्य केंद्रामधील प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. या आधी जूनमध्ये जारी केलेल्या सूचनांमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने कापडी मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे म्हटले होते. विशेषतः जिथे कोरोनाचा फैलाव अधिक आहे, तिथं हे आवश्यक आहे. आता संघटनेने नवीन नियम जारी केले आहेत.

मास्क वापरण्याबाबत नवीन सूचना

सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या भागात कोरोनाचा संसर्ग अधिक आहे, त्या भागात 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसह सर्वांनी फेसमास्क वापरणं अनिवार्य आहे. दुकाने, कार्यालये, शिक्षण संस्था अशा ठिकाणी वातानुकुलन यंत्रणा बंद असेल तर मास्क लावणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा-CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार ; Secret Wuhan files मधून पितळ उघड

मुले, विद्यार्थी आणि पाहुण्यांसाठी शिफारस

ज्या ठिकाणी खेळती हवा नसेल अशा ठिकाणी, घरांमध्ये पाहुणे आले तर मास्क वापरणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी मोकळी हवा आहे, अशा ठिकाणी किमान एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवणे शक्य नसेल तर मास्क लावणे अत्यावश्यक आहे.  मास्कमुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होते पण त्याच बरोबर हात धुणे, अंतर ठेवणे यासारख्या उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कोविड 19च्या रुग्णांची देखभाल करताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी (Health Workers) एन-95 (N-95) मास्क लावणे अत्यावश्यक आहे. अस्थमासारखे आजार असणाऱ्या, जलद हालचाली होत असलेल्या व्यक्तींनी मास्क लावू नये. त्यांना श्वसनाला त्रास होऊ शकतो

Published by: Meenal Gangurde
First published: December 3, 2020, 6:57 PM IST

ताज्या बातम्या