WHOचे जनरल डायरेक्टर आले कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात, स्वत:ला करावं लागलं क्वारंटाइन

'कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या मी संपर्कात आल्यानं स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे.'

'कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या मी संपर्कात आल्यानं स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे.'

  • Share this:
    नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : भारतात कोरोनाच्या संसर्गाची रुग्णसंख्या कमी होत आहे तर रिकव्हरी रेट वाढत असतानाच आता युरोपीय देशांमध्ये कोरोनानं पुन्हा कमबॅक केलं आहे. युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्यानं तिथल्या काही देशांत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जगभरात कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेडरोस अधानोम गेब्रियेसस यांनी स्वत: ला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या मी संपर्कात आल्यानं स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. घरातून काम पाहात आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतल्याचं WHO चे डायरेक्टर जनरल टेडरोस अधानोम गेब्रियेसस यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. हे वाचा-स्वदेशी कोरोना लस कधी पर्यंत लाँच होणार? भारत बायोटेक दिली महत्त्वाची माहिती कोरोनाचा कहर सुरू असल्यानं फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा 4 आठवड्यांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. शाळा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं, बार रेस्टॉरंट इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे भारतात दर दिवसाला कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे वाढलेलं प्रमाण थोडं कमी आलं असून सध्या दिवसाला साधारण 50 हजाराच्या आसपास ही आकडेवारी आहे. तर रिकव्हरी रेट खूप वाढत असल्यानं दिलासा मिळाला आहे. कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत बायोटेक कंपनीची लस दुसऱ्या तिमाहीत तर सीरम इन्स्टिट्यूटला इमरजन्सी वापरण्याचा परवाना मिळाल्यास डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. WHO च्या डायरेक्टरना सेल्फ क्वारंटाइन व्हावं लागल्यानं काहीसं चिंतेचं वातावरण देखील आहे.
    First published: