मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Virus Updates: जूनमध्ये भारतात Corona ची चौथी लाट? , WHO चा मोठा इशारा

Corona Virus Updates: जूनमध्ये भारतात Corona ची चौथी लाट? , WHO चा मोठा इशारा

Corona Virus Updates: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसनं (corona virus) जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण (corona patients) सातत्याने कमी होत आहेत.

Corona Virus Updates: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसनं (corona virus) जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण (corona patients) सातत्याने कमी होत आहेत.

Corona Virus Updates: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसनं (corona virus) जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण (corona patients) सातत्याने कमी होत आहेत.

नवी दिल्ली, 17 मार्च: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसनं (corona virus) जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण (corona patients) सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे सर्व देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मोठा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी झेप दिसू शकते, असा इशारा WHO नं जगभरातील देशांना दिला आहे.

भारतातही कोरोनाचा Alert

जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता भारतातही याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. जूनपर्यंत भारतात चौथ्या लाटेचा प्रभाव दिसून येईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच आरोग्य मंत्रालय कोरोनाबाबत सातत्याने बैठका घेत आहे. यासोबतच कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होताना दिसत असून त्याबाबत लादलेले निर्बंधही जवळपास हटवण्यात आले आहेत.

आशियातील देशांमध्ये प्रकरणे वाढण्याचा धोका

IANS या वृत्तसंस्थेनुसार WHO नं म्हटलं आहे की, जगभरात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढू शकतात. याचे कारण म्हणजे कोरोनाची चाचणी सातत्याने कमी होत आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. याशिवाय कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळू शकतात, हे देखील WHO ने सांगितले आहे. WHO च्या मते, आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात. जे काही देशांमध्ये वाढू लागलं आहे.

चीनमध्ये वाढताहेत कोरोनाचे रुग्ण

चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना WHO कडून इशारा देण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागात लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे, तर इतर भागात कडक निर्बंध लावण्यात येत आहे. येथे ओमायक्रॉन सब व्हेरिएंट BA.2 ची प्रकरणे नोंदवली जात आहेत. हे प्राणघातक मानले जात नसले तरी त्याचा प्रसार वेगाने होत आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनं जगाला हैराण केलं आहे.ओमायक्रॉन नंतर आता नवीन व्हेरिएंटही समोर आले आहे. ज्याने चिंता वाढवण्याचे काम केले आहे. इस्रायलमध्ये या प्रकाराची दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. कोरोनाचे हे नवीन व्हेरिएंट कोविड-19, BA.1 आणि BA.2 च्या सब व्हेरिएंटनी बनलेले आहे. सध्या या प्रकाराबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही, मात्र ते फारसे धोकादायक नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Who