मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /यावेळी कोरोनाचा वार छातीवर नाही, शरीराच्या या भागांवर होतोय परिणाम; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

यावेळी कोरोनाचा वार छातीवर नाही, शरीराच्या या भागांवर होतोय परिणाम; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रकारे लोकांना छातीत जंतुसंसर्ग झाला होता, त्याप्रमाणे आता नेमक्या कोणत्या भागावर जास्त परिणाम होत आहे, याबाबत डॉक्टरांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 27 जानेवारी : कोरोना विषाणू (corona virus) संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. ओमिक्रॉन (Omicron) केसेसचे प्रमाणही खूप वाढले आहे, परंतु आतापर्यंत असे समोर आले आहे की कोरोनाच्या या लाटेत लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज कमी झाली आहे. यामुळे हा प्रकार अधिक धोकादायक मानला जात नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रकारे लोकांना छातीत जंतुसंसर्ग झाला होता, त्याप्रमाणे आता कोणत्या भागावर जास्त परिणाम होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसे, आजपर्यंत अशी प्रकरणे आढळलेली नाहीत की, शरीराच्या कोणत्याही विशिष्ट भागावर ओमिक्रॉनचा फार मोठा परिणाम झाला आहे. आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात की, ओमिक्रॉनमध्ये कोणत्या अवयवावर परिणाम होत आहे आणि लोकांमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे येत आहेत.

Omicron चा शरीरावर परिणाम होतो?

ओमिक्रॉनच्या प्रभावाबाबत, डॉ. सरमन सिंग, डायरेक्टर आणि सीईओ, एम्स भोपाळ यांनी एआयआर न्यूजला सांगितले की, “ओमिक्रॉन प्रकार फुफ्फुसात जात नाही, ते वरच्या श्वसनमार्गामध्ये, घसा आणि नाकामध्ये मर्यादित राहतो ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज किंवा आयसीयूमध्ये जाण्याची समस्या फार कमी लोकांना होत आहे. याला अनेक कारणे आहेत, एक म्हणजे या प्रकारात धोका प्रमाण कमी आहे, दुसरे म्हणजे, देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे ही लसही कुठेतरी आपले खूप संरक्षण करत आहे.

यासोबतच डॉ सरमन सिंह म्हणाले, की लक्षणांविषयी बोलायचे झाल्यास खोकला, ताप, अंगदुखी, खांदे, गुडघेदुखी ही लक्षणं अधिक दिसत आहेत. दुस-या लाटेत, डेल्टा व्हेरियंटच्या बाबतीत घडलेल्या गोष्टी ओमिक्रॉनमध्ये घडताना दिसत नाहीत.

हे वाचा - एकाच व्यक्तीला कितीवेळा Omicron ची लागण होऊ शकते; उत्तर सर्वांना घाबरवणारं आहे

Omicron धोकादायक नाही का?

यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा कमी गंभीर आहे, परंतु तो रोग पूर्वीच्या स्ट्रेनइतका गंभीरही बनू शकतो. कोरोनाच्या मागील स्ट्रेनपासून धडा घेत, ओमिक्रॉनला कमी लेखता येणार नाही. ज्या रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग होतो त्यातील काहींना गंभीर त्रासही होऊ शकतो. लक्षणे नसलेल्या संसर्गामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू होऊ शकतो. जे लोक आधीच आजारी आहेत, वृद्ध आहेत किंवा लस घेतलेली नाही त्यांना ओमिक्रॉन होण्याचा धोका जास्त असतो.

हे वाचा - Omicron हा कोरोना महामारीचा शेवट आहे का? जाणून घ्या, काय म्हणाले WHO चे प्रमुख

Omicron प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी संक्रमित करेल

WHO च्या मते, Omicron संसर्ग पसरवण्याच्या बाबतीत कोरोनाच्या धोकादायक प्रकारांनाही मागे टाकत आहे. हा विषाणू प्रकार फार वेगाने पसरत आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे जगभरात वाढत आहेत, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीला याची लागण होऊ शकते. सतर्क राहणे गरजेचे आहे. WHO ने आधीच एक विधान केले आहे की प्राथमिक पुरावे सूचित करतात की सध्या अस्तित्वात असलेल्या लसी ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी कमी प्रभावी सिद्ध होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

First published:

Tags: Coronavirus, Omicron