कोरोना रुग्णांना का देत नाहीत लस? जाणून घ्या कारणं

कोरोना रुग्णांना का देत नाहीत लस? जाणून घ्या कारणं

देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरणाच्या (Vaccination Drive) पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणाबाबत अनेक गैरसमज अजूनही आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांनी लस घेऊ नये, याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच.

  • Share this:

मुंबई, 14 मे : देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरणाच्या (Vaccination Drive) पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणाबाबत अनेक गैरसमज अजूनही आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांनी लस घेऊ नये, याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. तर यामागची कारणं काय आहेत आणि कोरोना झालेल्या रुग्णाला जर लस दिली, तर त्याचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कोरोना रुग्णांनी लस केव्हा घ्यावी, यावर अनेक अभ्यास झालेत. भारतातील NTAGI नेही लस घेण्याच्या वेळेबद्दल काही शिफारसी केल्या आहेत. या समितीचं म्हणणं आहे, की कोव्हिशिल्ड (covishield) लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात यावं. याशिवाय कोरोनातून बरे झालेल्या लोकांना 6 महिन्यांनी लस देण्यात यावी. मात्र, कोव्हॅक्सिन (covaxin) बद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. तर,ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सर्वात आधी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस 4 ते 8 आठवड्याच्या अंतराने देण्यास परवानगी दिली होती. तर कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील अंतर 4 ते 6 आठवडे ठेवलं. मात्र एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांनी घेण्यास सांगितलं.

कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?

जर तुम्ही लस घेतलेली नाही आणि कोरोनाची लागण झाली असल्यास कमीत कमी 90 दिवस म्हणजेच तीन महिने तुम्ही लस घेऊ नये. तर,वायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांनी 6 महिने लस न घेण्याचा सल्ला दिलाय. यासाठी त्यांनी युकेतील डेटाचा हवाला दिला आहे. या डेटानुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज विषाणूपासून तुमचा 80टक्के बचाव करतात. त्यामुळे बरे झाल्यानंतर 6महिने लस घेऊ नये. तसेच आकडेवारीची तुलना केल्यानंतर WHO ने ही हाच सल्ला दिलाय.

पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास काय करायचं?

कर्नाटकचे कोरोनाच्या जेनेटिक कन्फर्मेशनचे नोडल अधिकारी डॉ. रवी म्हणाले, की पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यानंतर 8 आठवड्यांनी तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता.

कोरोना झाल्यानंतर लगेच लस न घेण्याचं कारण

तुम्हाला कोरोना झाला असेल तर तुमचे शरीर त्या विषाणू विरोधात लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार करतं. मात्र, तुम्ही लस घेतल्यानंतर शरीरातील अँटिबॉडीज प्रभावीरित्या काम करत नाही. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्ट दुसरा डोस घेण्यासाठी किमान 8 आठवड्यांचं अंतर ठेवण्यास सांगतात. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास काहींना सौम्य तर काहींना गंभीर लक्षणं जाणवतात.

पहिला डोस घेतल्याच्या तीन आठवड्यात कोरोना झाल्यास लस तेवढी प्रभावी ठरणार ना्ही. मात्र, त्यानंतर झाल्यास कोरोनाची लक्षणं सौम्य जाणवतील. संशोधक सध्या नैसर्गिकरित्या आणि लसीपासून मिळणाऱ्या इम्युनिटीबद्दल शोध घेत आहेत. CDC ने दिलेल्या माहितीनुसार, लस घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार व्हायला दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या दरम्यानच्या कालावधीत संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्हाला आतापर्यंत कोरोना झालेला नाही आणि पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस मिळत नाहीए. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नसून लस उपलब्ध झाल्यानंतर दुसरा डोस घ्यावा, असं महाराष्ट्र टास्क फोर्सचे (maharshtra task force) सदस्य डॉ. शशांक जोशींनी सांगितलं.

जगभरात तयार झालेल्या सर्व कोरोना लसींवर अभ्यास सुरू आहे. मेडीकल जर्नल द लॅसेंटमधील एका अभ्यासानुसार, कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये 12 आठवड्याचं अंतर असल्यास त्याचे 81.3 टक्के परिणाम दिसून येतात. तर, 6 पेक्षा कमी आठवड्यांचं अंतर राहील्यास त्याचा परिणाम केवळ 55.1टक्के होतो. प्रोफेसर रवि म्हणाले, की दोन डोसमध्ये जेवढं जास्त अंतर असेल तेवढी जास्त ती प्रभावी ठरेल.

तु्म्हाला प्रश्न पडत असेल की एक डोस कोव्हॅक्सिनचा घेतला आणि दुसरा कोव्हिशिल्डचा घेतल्यास काय होईल. तर एक्स्पर्ट म्हणतात की याबद्दल पर्याप्त संशोधन अद्याप झाले नसल्यानं माहिती उपलब्ध नाही. तर सीडीसीने सांगितलंय की, लसीच्या डोसमध्ये अदला-बदल करू नये. पहिला डोस घेतलेली लस दुसऱ्या डोससाठी न मिळाल्यास 6आठवडे वाट पाहावी. कारण जर दोन्ही डोस एकाच लसीचे असतील तर शरीरावर जास्त प्रभावी ठरते.

First published: May 16, 2021, 7:30 AM IST

ताज्या बातम्या