Home /News /coronavirus-latest-news /

नव्या वर्षात फेब्रुवारीपर्यंत भारतातला कोरोनाचा जोर खरंच ओसरणार?

नव्या वर्षात फेब्रुवारीपर्यंत भारतातला कोरोनाचा जोर खरंच ओसरणार?

भारतात (India) कोरोनाबाधितांची (Corona) संख्या कमी होत असून दिलासा मिळत असल्याचे आपण सध्या ऐकत आहोत. परंतु, नोव्हेंबरपर्यंत आपण पाहिलं तर कोरोना संसर्ग झाल्याच्या एका कन्फर्म केसच्या (Confirm Cases) तुलनेत सरासरी 90 केसेस या अशा होत्या की त्या लक्षातच आलेल्या नाहीत.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 17 डिसेंबर :  नव्या वर्षात कोरोनाचा (Coronavirus) भर ओसरणार, देश कोरोनामुक्त होणार, अशी भविष्यवाणी चर्चेत होती. पण त्यात किती तथ्य आहे?  केंद्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या एक्सपर्टस पॅनेलने (Expert Panel) सुपर मॉडेलच्या (Super Model) आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय प्रशासनाची उदासीनता आणि कोरोनाबाबत (Corona) अपेक्षित प्रमाणात चाचण्या करण्यासाठी पुरेशी क्षमता नसल्याने खरी परिस्थिती लक्षातच आलेली नाही. या पॅनेलच्या मते,  फेब्रुवारी 2021 मध्ये देशात कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असेल, पण धोका संपलेला नसेल. हे समजून घेण्यासाठी कोविड आकडेवारीचं  (Covid-19) गौडबंगाल समजून घ्यायला हवं. भारतात (India) कोरोनाबाधितांची (Corona) संख्या कमी होत असून दिलासा मिळत असल्याचे आपण सध्या ऐकत आहोत. परंतु, नोव्हेंबरपर्यंत आपण पाहिलं तर कोरोना संसर्ग झाल्याच्या एका कन्फर्म केसच्या (Confirm Cases) तुलनेत सरासरी 90 केसेस या अशा होत्या की त्या लक्षातच आलेल्या नाहीत. या आकडा नेमकं काय दर्शवतो? हा आकडा सप्टेंबरमध्ये 60 ते 65 केसेस असा होता. दुसरीकडे दिल्ली आणि केरळमध्ये प्रत्येक संसर्गजन्य केसच्या तुलनेत सुमारे 25 केस ओळखल्या जाऊ शकल्या नाहीत. बिहार, (Bihar) उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) तर हा आकडा 300 पर्यंत होता. ही आकडेवारी कशी समजून घ्यावी, आणि काय निष्कर्ष काढावा. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (Science And Technology) पॅनेलने ही आकडेवारी दिली असून, या पॅनेलने सुपर मॉडेल तयार करुन फेब्रुवारी 2021 पर्यंत भारत कोरोनामुक्त होईल, असे अनुमान वर्तवले होते. या पॅनेलने राज्यवार आकडेवारी स्पष्ट करत बहुतांश राज्यांमध्ये प्रत्येक कन्फर्म केसच्या (Conferm Cases) तुलनेत 70 ते 120 केसेस या लक्षात होऊ शकल्या नसल्याचे नमुद केले आहे. आकडे काय सांगतात या पॅनलच्या अहवालविषयक ताज्या वृत्तानुसार, सुमारे 90 केसेस लक्षात न आलेल्या भारतातील या आकड्यांकडे पाहता, प्रत्येक स्पष्ट झालेल्या केसच्या तुलनेत स्पष्ट होऊ न शकलेल्या केसेसची संख्या यूके आणि इटलीत केवळ 10 ते 15 होती. दिल्लीत दुसऱ्या लाटेदरम्यान 43 केसेस या दुर्लक्षित राहिल्या. तिसऱ्या लाटेदरम्यान दिल्ली सरकारने अधिकाधिक चाचण्या करण्याची ताकीद दिल्याने हा आकडा 21 पर्यंत खाली आला आहे. ज्याला मेसेज येणार त्यालाच कोरोना लस मिळणार,आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती हैद्राबाद आयआय़टी, वेल्लूर, कोलकता, बेंगळुरु येथील विज्ञान संस्थांमधील तज्ज्ञ या पॅनेलमध्ये होते. त्यांनी केलेल संशोधन नंतर मेडिकल रिसर्चच्या नियतकालिकातही प्रसिध्द झाले. काय आहे भविष्यवाणी या पॅनेलने त्यांच्या सुपर मॉडेलनुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील कोरोना साथ जवळपास संपुष्टात येईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतात या कालवाधीनंतर कोरोना संसर्गाची लाट येण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये अक्टिव्ह केसेसची संख्या केवळ 20 हजारच राहील, कारण संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होऊ न शकलेल्या केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. पॅनेलच्या म्हणण्यानुसार, देशातील 60 टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित झाली आहे किंवा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती - इम्युनिटी (Immunity) विकसित झाली आहे. 60 टक्के लोकसंख्येत प्रतिपिंडे (Antibody) विकसित झाली आहेत, कारण सण, उत्सवांच्या काळातही देशातील काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गात वाढ न झाल्याचे दिसून आले आहे. दिल्ली, उत्तराखंड आणि मेघालय या राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. दहन की दफन यावरून पेटलं राजकारण! श्रीलंकेतल्या मुस्लिमांचं मालदीव करणार दफन या आकडेवारीकडे पाहता भारतात जर संसर्गाची लाट आता आली नाही तर ते एक आश्चर्यच म्हणावं लागेल. कारण काही देशांमध्ये कोरोनाची लाट आली आहे. ब्रिटनमध्येही लाट आहे. जर्मनी (Germany) आणि स्वीडनमध्ये (Sweden) हर्ड इम्युनिटी विकसित होऊनही पुन्हा लॉकडाउन (Lockdown) जारी करावा लागला आहे. इकडे भारतात फक्त सप्टेंबरमध्येच संसर्गाची लाट येऊन रुग्णसंख्या वाढली होती. त्यानंतर मात्र रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. याबाबत पॅनेलमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ‘द प्रिंट’ने आपल्या वृत्तात असं म्हटलं आहे, की भारतात जी अकार्यक्षमता दिसून आली ती फायदेशीर ठरली. उदाहरण द्यायचं झालं तर जर्मनीत एक महिन्याचा कडक लॉकडाऊन जाहिर झाला, या दरम्यान लोक घराबाहेर पडली नाही. परंतु भारतात एक महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतर सर्व गोष्टी शिथील झाल्या. मोठ्या संख्येने लोकं घराबाहेर पडली आहेत. अनेक जण तर मास्क वापरण्याकडेही दुर्लक्ष करताना दिसत आहेत. याचा अर्थ असा की जर्मनीसारख्या देशांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेला नाही. केसेस स्पष्ट झाल्या नसल्या तरी पण भारतात मात्र संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. दक्षिण आशिया (South Asia)आणि अफ्रिकेत (Africa) विषाणूचा परिणाम तुलनेने कमी झाला आहे. येथे युवकांची संख्या अधिक असल्याचा हा परिणाम असू शकतो. एकूणच या माहितीचा विचार केला तर हर्ड इम्युनिटी वाढल्याचे संकेत स्पष्ट असून फेब्रुवारीपर्यंत संसर्ग पुर्णपणे आटोक्यात येऊ शकतो.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या