मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Covid-19 आणि Dengu मध्ये काय आहे फरक? डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Covid-19 आणि Dengu मध्ये काय आहे फरक? डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

डेंग्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांमध्ये व्यक्तीला खूप ताप येतो. पण या आजाराचं लवकर निदान न झाल्यास, अनेक रुग्ण चुकीचे उपचार घेतात

डेंग्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांमध्ये व्यक्तीला खूप ताप येतो. पण या आजाराचं लवकर निदान न झाल्यास, अनेक रुग्ण चुकीचे उपचार घेतात

डेंग्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांमध्ये व्यक्तीला खूप ताप येतो. पण या आजाराचं लवकर निदान न झाल्यास, अनेक रुग्ण चुकीचे उपचार घेतात

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 ऑक्टोबर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अद्यापही धोका टळलेला नाही. दुसरीकडे डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे. पण कोरोना आणि डेंग्यू या दोन्ही आजारांबाबत अनेकदा रुग्ण, नातेवाईक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. काहीजणांना कोरोनाची लागण होते, मात्र त्यांना वाटतं की डेंग्यू झाला आहे. तर, काहींना डेंग्यू होतो, पण त्यांना वाटतं की कोरोना झाला आहे. मुळात कोरोना आणि डेंग्यू ही दोन्ही व्हायरल इन्फेक्शन आहेत, आणि त्यांची लक्षणं खूप सारखी आहेत.

डेंग्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांमध्ये व्यक्तीला खूप ताप येतो. पण या आजाराचं लवकर निदान न झाल्यास, अनेक रुग्ण चुकीचे उपचार घेतात, व त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होते. त्यामुळेच कोरोना व डेंग्यू या दोन आजारांमधील फरक ओळखणं महत्त्वाचं आहे. आता हा फरक कसा ओळखायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण काळजी करु नका, आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. यासंबंधी असणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरं आम्ही नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या फिजिशियन डॉ. सोनिया रावत यांच्याकडून जाणून घेतली आहेत.

(Diabetes ला रोखण्याचा सोपा मार्ग; लक्षणं दिसताच त्वरित करा हे 5 उपाय)

कोरोना आणि डेंग्यू ताप यातील फरक काय?

डॉ. सोनिया रावत यांनी सांगितलं की, ‘कोरोना आणि डेंग्यू हे दोन्ही विषाणूजन्य आजार आहेत. डेंग्यूचा विषाणू संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरतो, तर कोरोनाचा विषाणू संक्रमित लोकांच्या संपर्कातून पसरतो.

(Beed Dengue : बीड जिल्ह्यात डेंग्युचे थैमान 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू)

या दोन्हीपैकी कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यास, एखाद्या व्यक्तीला खूप ताप येतो. वेळीच उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कोरोना आणि डेंग्यू या दोन्हीमध्येही तापाने श्वसन प्रणाली प्रभावित होते. दोन्ही संसर्गांची बहुतेक लक्षणं सारखीच आहेत, परंतु काही लक्षणं भिन्न आहेत, ज्यावरून त्यातील फरक ओळखता येतो.’

असा ओळखा फरक

डॉक्टरांच्या मते, ‘एखाद्या व्यक्तीला डेंग्यूच्या विषाणूची लागण झाल्यास त्याला खूप ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, त्वचेवर पुरळ उठणं, नाकातून रक्त येणं आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होणं, अशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. डासांची संख्या जास्त असलेल्या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त असतो. तर, कोरोनात रुग्णामध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, घसा खवखवणं, खोकला, सर्दी अशी लक्षणं दिसतात. डेंग्यूमध्ये त्वचेवर लाल पुरळ उठतात, पण कोरोनात असं होत नाही. डेंग्यूमध्ये, प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते, तर कोरोनात श्वसन प्रणालीची समस्या निर्माण होते. कोरोनामध्ये फुफ्फुसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. दोन्ही आजारांतील फरक ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्त तपासणी हा आहे.’

First published:

Tags: Covid-19