Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus चा नाश करणारी लस तयार झालीच नाही तर काय होईल?

Coronavirus चा नाश करणारी लस तयार झालीच नाही तर काय होईल?

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

Coronavirus विरोधात अनेक लसींचं (vaccine) ट्रायल सुरू आहे, मात्र चाचण्या यशस्वी होतीलच किंवा लस सुरक्षित असेलच हे आधीच सांगता येऊ शकत नाही.

    मुंबई, 04 मे : डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये उद्रेक कोरोनाव्हायरस तब्बल 4 महिने इतर देशांमध्येही धुमाकूळ घालत आहे. झपाट्याने पसरतो आहे. या महाभयंकर व्हायरसचा नाश करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ औषध, लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी लस मिळाली नाही. समजा दर कोरोनाव्हायरसवर लस तयार झालीच नाही तर मग काय? सीएनएनने काही तज्ज्ञांची याबाबत मतं जाणून घेतलीत. जागतिक आरोग्य संघटनेतील कोविड-19 बाबत विशेष दूत आणि ग्लोबल हेल्थ एक्सपर्ट डॉ. डेव्हि़ड नबेरो यांनी सीएनएनवर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. डेव्हिड नबेरो यांनी सांगितलं की, "जगभरात असे कित्येक व्हायरस आहेत, ज्यांच्याविरोधात आतापर्यंत लस विकसित झालेली नाही. लस कधी तयार होईल आणि तयार झाली तरी ती सुरक्षिततेच्या सर्व परीक्षा पास होईल हे आधीच सांगू शकत नाही. कोरोनाव्हायरसविरोधात लस मिळत नाही तोपर्यंत या व्हायरसह जगायला शिकायला हवं. जगभरातील लॉकडाऊन हळूहळू उठवायला सुरुवात करायला हवी. अशा परिस्थितीत टेस्टिंग काही कालावधीसाठी आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होईल. यादरम्यान कित्येक देशांमध्ये तर सेल्फ आयसोलेशनचे निर्देश जारी होतील" हे वाचा - भारतातल्या कोरोना रुग्णांना दिली जाणार अमेरिकेतली कथित संजीवनी काही शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधात लस विकसित होईल अशी आशा व्यक्त केली आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसजीजचे संचालक डॉ. अँथोनी फॉसी यांच्यासह जगभरातील शास्त्रज्ञ 12 ते 18 महिन्यात लस तयार होण्याचा दावा करत आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉ. पीटर हॉट्स यांनी सांगितलं की, असं अजिबात नाही की कोरोनाव्हायरसची लस तयारच होणार नाही. मात्र ही लस तयार करणं म्हणजे खूप मोठं यश असेल. त्यामुळे जर लस तयार झाली नाही तर आपल्याकडे प्लॅन बी असणंही गरजेचं आहे. म्हणजे जर शास्त्रज्ञ कित्येक वर्ष कोरोनाव्हायरसची लस तयार करू शकले नाही तर माणसांना यासह जगण्याची सवय करावी लागेल" हे वाचा - धक्कादायक! हसता-बोलता होताय कोरोना रुग्णांचा मृत्यू, काही तासांतच जातोय जीव पिडियाट्रिशियन अँड इन्फेक्शिअस डिसीजचे स्पेशालिस्ट पॉल ऑफिट सांगतात की, "एचआयव्हीची परिस्थिती आपण सध्या पाहू शकतो, एका गंभीर आजारासहदेखील माणूस जगू शकतो. एचआयव्हीविरोधात नियमित घेतली जाणारी काही औषधं याआधीदेखील माणसांना आजारांपासून वाचवलं आहे. तसंच कोरोनाव्हायरसबाबतही होऊ शकतं. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अँटि मलेरिया औषध हायड्रोक्लोरोक्विन, अँटि एबोला औषध रेमडेसिवीर आणि ब्लड प्लाझ्मा ट्रिटमेंट यांचा कोरोनाव्हायरविरोधात प्रयोग करून पाहिला आहे. नॉटिंघम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक किथ नील यांच्या मते, "कोविड-19 विरोधात आतापर्यंत जितक्या औषधांचं परीक्षण झालं, ते सर्व उत्तम आहेत. या आजाराचा नाश करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात रँडम कंट्रोल ट्रायल करायला हवेत. मात्र त्यावर अधिक संशोधन करायला हवेत" संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - Coronavirus चा धोका : तुमच्या त्वचेवर तर अशी लक्षणं नाहीत ना? दुर्लक्ष करू नका
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या